Dino Morea Dainik Gomantak
मनोरंजन

Dino Morea: डिनो मोरियोने आपल्या एक्स गर्लफ्रेंड बिपाशाचे केले कौतुक

Dino Morea: त्यावर त्याने आपल्याला सिंगल पॅरेंट बनायचे नसून मला लग्न करायचे आहे आणि माझ्या जोडीदारासोबत मला पालक व्हायचे असे उत्तर डिनोने दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Dino Morea: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आता अभिनेता डिनो मोरिया एका मुलाखतीत केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. आपल्याला मुले हवी आहेच मात्र मला सरोगसी पासून मुले नकोत, सिंगल पॅरेंट मला बनायचे नाही मला माझा पार्टनर हवा आहे आणि मग मुले हवी आहेत, असे डिनो मोरियाने म्हटले आहे.

काही काळापूर्वीच 'मेंटलहूड' या वेब सीरीज मध्ये डिनोने केलेल्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. एका मुलाखतीदरम्यान, त्याला सरोगसी किंवा दत्तक घेऊन बाळ हवे की लग्नानंतर तो पालक बनणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने आपल्याला सिंगल पॅरेंट बनायचे नसून मला लग्न करायचे आहे आणि माझ्या जोडीदारासोबत मला पालक व्हायचे असे उत्तर डिनोने दिले आहे. याबरोबरच, तो पुढे म्हणाला की मला माहित आहे की मी उत्तम वडील बनेन.

याबरोबरच डिनोने आपली फेवरेट को-स्टार म्हणून बिपाशाचे कौतुक केले आहे. बिपाशा आणि डिनो यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. डिनो मोरियाने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला त्याने बिपाशासोबत बहुतेक चित्रपट केले होते आणि त्यांची जोडी खूप आवडली होती. डिनो मोरिया आणि बिपाशा यांच्या जोडीने 2002 मध्ये आलेल्या 'राज' चित्रपटात जादू निर्माण केली होती. हा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट होता.

बिपाशाशिवाय डिनोचे नाव नंदिता महतानी आणि लारा दत्ता यांच्याशी जोडले होते. आता डनो एका योग्य जोडीदाराच्या शोधात असल्याचे सांगताना दिसत आहे.

डिनो मोरियाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो गेल्या काही काळापासून साऊथ चित्रपटांमध्ये दिसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी मल्याळम, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमध्ये, तो शेवटचा 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' चित्रपटात कॅमिओमध्ये दिसला होता. यामध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT