PM Narendra Modi  Dainik Gomantak
मनोरंजन

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

PM Narendra Modi Cameo Dhurandhar 2: दिग्दर्शक आदित्य धर यांनी या भागात प्रेक्षकांसाठी अनेक अनपेक्षित 'सरप्राइज' दिले आहेत, जे प्रत्यक्ष आयुष्यातील घडामोडींशी मिळतेजुळते असल्याने प्रेक्षकांना अधिक भावत आहेत.

Manish Jadhav

PM Narendra Modi Cameo Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातल्यानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच 'धुरंधर 2' चा बॉक्स ऑफिसवर प्रचंड बोलबाला पाहायला मिळत आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारख्या तगड्या स्टारकास्टमुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज (19 मार्च) हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यावरुन या चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या भागात प्रेक्षकांसाठी अनेक अनपेक्षित 'सरप्राइज' दिले आहेत, जे प्रत्यक्ष आयुष्यातील घडामोडींशी मिळतेजुळते असल्याने प्रेक्षकांना अधिक भावत आहेत.

या चित्रपटातील सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पडद्यावर दिसलेली झलक. सोशल मीडियावर (Social Media) सध्या 'धुरंधर 2' मधील अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पंतप्रधानांशी संबंधित महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. विशेषतः 2016 मध्ये अचानक घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा थरारक प्रसंग आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाचा उल्लेख चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला आहे. चित्रपटात पंतप्रधानांची भूमिका प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांनी साकारली असून ते अजय सन्यॉल यांच्यासोबत एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनवर चर्चा करताना आणि गुप्त बैठकीत मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हे दृश्य पाहताना प्रेक्षक थक्क होत असून चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पडत आहे.

चित्रपटाचे (Moive) कथानक केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून त्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वाचाही धागा गुंफण्यात आला आहे. एका महत्त्वाच्या सीनमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना दाखवला आहे. मोदींचे सरकार आपल्यासाठी कशी मोठी अडचण बनले आहे आणि त्यांच्या कडक धोरणांमुळे आपले साम्राज्य कसे धोक्यात आले आहे, याचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. वास्तविक आयुष्यातील संदर्भांचा वापर केल्यामुळे चित्रपट अधिक वास्तववादी वाटत असून स्पॉयलरपासून वाचण्यासाठी प्रेक्षक लवकरात लवकर चित्रपट पाहण्यास पसंती देत आहेत. 'धुरंधर 2' मध्ये केवळ अ‍ॅक्शनच नाही, तर देशहिताशी संबंधित अशा अनेक संवेदनशील विषयांना स्पर्श करण्यात आला आहे, ज्यामुळे हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

VIDEO: 15 चेंडूत 40 धावांची गरज... अन् शेवटचा चेंडू! आरसीबीचा पॉवर हिटर पास झाला की फेल? सोशल मीडियावर थरार व्हायरल

SCROLL FOR NEXT