Dharmendra Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra: 'जेव्हा मी ठीक आहे म्हटलं अन् ...' धर्मेंद्रची पोस्ट पाहून चाहते काळजीत

Dharmendra: सोशल मिडियावर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Dharmendra: बॉलीवू़डचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांचे नाव घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या नातवाच्या करण देओलच्या लग्नामुळे मोठ्या चर्चेत होते. ते या लग्नात मजा करताना आनंदी दिसत होते. मात्र आता त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

धर्मेंद्र यांनी सोशल मिडियावर त्यांचा जूना फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चाहते काळजीत पडले आहेत. धर्मेंद्र यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, 'साथ जो सांस था जाने क्यू उस साथने अचानक हाथ छोड दिया'

धर्मेंद्र यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे ते उदास असल्याचे म्हटले जात आहे. आता चाहत्यांनी त्यांना काळजी घ्यायला सांगत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. एका युजरने म्हटले आहे आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजी घ्या, देवाकडे प्रार्थना. ईशा देओलने देखील त्यांच्या या पोस्टवर लव्ह यू अशी कंमेट केलेली दिसून येते.

दुसरा एक फोटो पोस्ट करत धर्मेंद्र यांनी लिहले आहे की, 'फासलों का अहसास तब हुआ , जब मैंने कहा मैं ठीक हॅू और उसने मान लिया' त्यांच्या अशा पोस्टमुळे चाहते काळजीत पडल्याचे दिसून येत असून धर्मेंद्रजी का उदास आहेत असे प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात धर्मेंद्रजी उत्साहात दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT