Dhak Dhak Girl Madhuri will be the attraction today in iffi  Dainik Gomantak
मनोरंजन

‘धकधक गर्ल’ माधुरीचे आज असणार आकर्षण!

52 व्या इफ्फीचा शानदार समारोप : हृतिक रोशन, मनोज वाजपेयी यांचीही उपस्थिती

दैनिक गोमन्तक

गेले आठ दिवस मांडवी किनाऱ्यावर सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीचा (IFFI) रविवार, 28 रोजी शानदार समारोप होणार आहे. उदघाटन सोहळ्याप्रमाणेच समारोप समारंभालाही बॉलिवूड (Bollywood) फिल्म इंडस्ट्रीमधील विविध कलाकार येणार असून यामध्ये प्रामुख्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), ॲक्शन हिरो हृतिक रोशन आदींसह मान्यवर कलाकारांचे आकर्षण असणार आहे. तर ‘किंग्ज युनायटेड’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘रॉक बॅण्ड’ ऑर्केस्ट्रामधून प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या संगीत मैफलीने या समारंभाला चार चांद लागणार आहेत.

ताळगाव येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये दुपारी ४ वाजता हा समारंभ होणार आहे. या समारंभास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, मनोज वाजपेयी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात एकूण 15 सिनेमे असून यामध्ये तीन भारतीय सिनेमांचा समावेश आहे. त्यामध्ये दिमासा भाषेतील पहिल्याच सिनेमाचा समावेश आहे. उत्कृष्ट सिनेमासोबतच उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि प्रथम दिग्दर्शन आदी पुरस्कार देखील कोण पटकावणार हे स्पष्ट होणार आहेे.

यावर्षीचा इफ्फी हा गेल्या वर्षीप्रमाणेच हायब्रीड स्वरूपात होता. जगभरातील सिनेरसिकांनी त्याला खूपच सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनानंतर होणारा हा पहिला सिनेमहोत्सव आहे. अशा अडचणीच्या काळातही उत्तमोत्तम सिनेमे दाखवल्याने रसिक अतिशय समाधानी असल्याचे दिसले.

- सुभाष फळदेसाई, उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन सोसायटी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT