Deepika Padukone Shah rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Controversy : बेशरम रंग गाण्यातली बिकीनी तशीच राहणार? सेन्सॉरने हा बदल सुचवलाच नाही.

'बेशरम रंग'च्या बिकीनीवर प्रचंड वाद सुरू होता, पण तरीही बिकीनीच्या रंगावर सेन्सॉरने कोणताच आक्षेप घेतला नाही.

Rahul sadolikar

शाहरुख खानचा पठाण गेले कित्येक दिवस सातत्याने चर्चेत आहे. पठाण चित्रपटाच्या बेशरम रंग या गाण्यावरुन माजलेला गोंधळ अजुनही संपलेला नाही. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या गाण्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हिंदु धर्माचा अपमान झाला असा आरोप करुन चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती.

बऱ्याच वादानंतर शेवटी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करावेत आणि रिलीज करण्याआधी तो सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात यावा अशी सुचना केली होती.

त्याप्रमाणे चित्रपटाच्या दिग्दर्शकाने, निर्मात्याने त्यात काही बदल केले आहेत ;पण ज्या बिकीनीच्या रंगावरुन हा वाद झाला त्या बिकीनीच्या रंगात काही बदल दिसणार नाहीत अशी माहिती आता समोर येत आहे.

मुळात सेन्सॉर बोर्डाने हे गाणं हटवायला हवं अशी सुचना केलेलीच नाही. किंवा दीपिकाच्या बिकीनीच्या रंगावरही कोणताही आक्षेप सेन्सॉर बोर्डाने घेतलेला नाही ;पण या गाण्यात तुम्ही 3 बदल करू शकता असं सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. हे तीन बदल नेमके कोणते आहेत ? चला पाहुया.

1. क्लोज बिकीनीतलं शूट

'बेशरम रंग' गाण्यातल्या क्लोज बिकीनी सिनमध्ये काही बदल करावेत अशी सुचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे.

2. डान्स स्टेप मध्ये बदल

बहुत तंग किया या लिरीक्सवेळी असणाऱ्या डान्स स्टेपमध्ये बदल केले जावेत. हा बदल सेन्सॉरने सांगितलेला आहे आणि तिसरा बदल हा गोल्डन बिकीनीतला आहे. या सिनमधल्या साईड पोझमध्येही बदल करावा असंही सेन्सॉरने सुचवलं आहे.

याशिवाय सेन्सॉर बोर्डाने बेशरम रंग गाण्यात कोणतेही बदल सुचवले नाहीत. आता पठाण चित्रपटात कोणतेच बदल केले नाहीत म्हटल्यावर याला विरोध करणारे काही गट चित्रपटाचं स्वागत कसं करतात हे आताच सांगणं कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा; रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने मिळणार डिस्चार्ज

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद अंत! मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू, तर फ्लॅटमध्ये आईचा मृतदेह पाहून चक्रावले पोलीस; नेमकं प्रकरण काय?

Dawood Ibrahim Property: दाऊद इब्राहिमला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; गुन्हेगारी साम्राज्यातील मालमत्तेवर सरकारची टाच

Israeli Soldier Iranian Girl Love Story: दुश्मनी विसरुन बांधली प्रेमाची गाठ! इस्रायली फौजी अन् इराणी सुंदरीची 'लव्हस्टोरी'; युद्धाच्या रणधुमाळीत उरकला साखरपुडा

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT