Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone: "शाहरुख आणि मी खेळाडू होतो म्हणून"...पठाणच्या वादावर दीपिका काय म्हणाली?

अभिनेत्री दीपिका पदुकोणने पठाणच्या झालेल्या वादावर एक मोठे विधान केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Deepika Padukone On Pathan Controversy : अभिनेता शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडत अनेकांना चकित केले आहे. दीपिका ही निर्विवादपणे बॉलिवूडची एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे. 

 नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दीपिका पदुकोणने या चित्रपटाच्या यशाबद्दल, शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव आणि दोघांमध्ये काय साम्य आहे याबद्दल खुलासा केला. पठाणच्या रिलीजपूर्वी ती वादांना कशी सामोरी गेली? याबद्दलही ती बोलली आहे.

शाहरुख सोबत काम करण्याच्या अनुभवावर दीपिका म्हणाली आम्हाला फक्त वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि नम्रता माहित आहे आणि यामुळे आम्ही जिथे आहोत तिथे पोहोचले आहे,” दीपिका म्हणाली.

ती पुढे म्हणाली की, प्रतिकूलतेला सामोरे गेल्यामुळे अनुभव आणि परिपक्वता येते. खेळ हा तिच्या आणि शाहरुखच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून ती म्हणाली, “आम्ही दोघेही खेळाडू आहोत. मला माहित आहे की शाहरुख शाळा-कॉलेजमध्ये खेळ खेळायचा. खेळ तुम्हाला संयमाबद्दल खूप काही शिकवतो.”

पठाणच्या रिलीजपूर्वी देशभरात मोठा विरोध झाला होता. दीपिका आणि शाहरुखचे पुतळेही काही ठिकाणी जाळले होते. बिहारमध्ये तर दोघांवर गुन्हा दाखल झाला होता .दोघांना मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा सामना कसा केला यावर दीपिका म्हणाली.

“मी म्हटल्याप्रमाणे, मला दुसरा कोणताही मार्ग माहित नाही. मी प्रतिक्रिया देत नाही पण नंतर समोर येते . परंतु तुमच्या विरोधातले आवाज बंद करणे हे फक्त संयम, लवचिकता आणि नम्रता असणं यामुळेच शक्य आहे.” तिचा आणि शाहरुखचा संयम खेळामुळे आल्याचं दीपिका सांगते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

SCROLL FOR NEXT