Deepika - Ranveer Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika-Ranveer: ...अन् रणवीर-दीपिका झाले पुन्हा ट्रोल 'हे' आहे कारण

Deepika-Ranveer: दरम्यान, यापूर्वी दीपीकाचा एक व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.

दैनिक गोमन्तक

Deepika-Ranveer: गेल्या काही दिवसांपासून दीपीका पदुकोण आणि रणवीर सिंग भलतेच चर्चेत आले आहेत. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. यादरम्यान, त्यांनी आपल्या नात्यावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या ट्रोलींगचा सामना करावा लागला होता. मात्र दोघांनीही आत्तापर्यंत यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.

नुकतेच दीपीका आणि रणवीर जिओ प्लाझाच्या कार्यक्रमात दिसून आले. त्यावेळी दोघे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत असल्याचे त्यांच्या वागण्यातून दिसून आले. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांना तो व्हिडिओ प्रचंड आवडतदेखील आहे.

मात्र काही नेटकऱ्यांना हे आवडले नसल्याचे दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वत:ची इमेज चांगली करण्यासाठी ते हे करत आहेत. दरम्यान, यापूर्वी दीपीकाचा एक व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती स्वत:लाच सुंदर म्हणताना दिसत आहे. त्यावेळी दीपीकाच्या व्हिडिओचे चांगलेच कौतुक झाले होते.

दीपीका-रणवीरला ट्रोल का केले जात आहे?

कॉफी विथ करण या चॅट शोच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये दीपीका आणि रणवीर सिंग या प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडीने हजेरी लावली होती. त्यावेळी दीपीकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील याबरोबरच रणवीर आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

काय म्हणाली दीपीका?

लग्नाआधी रणवीर आणि मी एका कॅज्युअल रिलेशन( Relationship )मध्ये होतो. त्याआधी मी ज्याप्रकारच्या नात्यात होते, त्यातून बाहेर येण्यासाठी मला वेळ हवा होता. मला काही काळ कोणालाही कोणतेही वचने द्यायची नव्हती.

त्यामुळे रणवीर( Ranveer Singh )ला मी कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. जोपर्यंत मला रणवीरने मला प्रपोज केले नव्हते तोपर्यंत आम्ही कॅज्युअल रिलेशनमध्ये होतो. पण मला या सगळ्यात मजा आली, आनंद मिळाला. असे दीपीका( Deepika Padukone ) ने म्हटले होते. आता दीपीकाचे हे म्हणणे किंवा वागणे अनेकांना पसंतील पडले नाही. नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रणवीर( Ranveer Singh ) आणि दीपीकाच्या घटस्पोटांच्या चर्चांना वेग आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT