Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone: जगप्रसिद्ध White House सीरिजमध्ये दिसणार दीपिका? सासूने लाइक केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Deepika Padukone: 'द व्हाईट हाऊस' ही एमी जिंकणारी मालिका आहे. त्याच्या मागील सीझनमध्ये थियो जेम्स, जेनिफर कूलिज आणि ऑब्रे प्लाझा या स्टार्सचा समावेश होता.

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone: दीपिका पादुकोन बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीला अनेक चित्रपटांसाठी प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. अलीकडच्या काळातील शाहरुख सोबतचे पठाण आणि जवान चित्रपटातदेखील तिच्या भूमिकांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आता दीपिका हॉलीवूडमध्ये दिसणार आहे.

असे म्हटले जात आहे की, 'द व्हाईट हाऊस' या प्रसिद्ध वेब सीरीजच्या तिसऱ्या भागात ती दिसणार आहे. जेनिफर कूलिज, थिओ जेम्स आणि ऑब्रे प्लाझा यांसारख्या प्रसिद्ध स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसू शकते. मात्र निर्माते किंवा स्वतः दीपिकाकडून याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केले गेले नाही.

या चर्चांना उधाण येण्याची रणवीर सिंगची आई कारण ठरली आहे. दीपिका पदुकोणची सासू अंजू भवनानी यांना एक सोशल मीडिया पोस्ट लाईक झाली होती, ज्यानंतर ती 'द व्हाईट लोटस 3' चा भाग होण्याच्या शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती.

'द व्हाईट हाऊस' ही एमी जिंकणारी मालिका आहे. त्याच्या मागील सीझनमध्ये थियो जेम्स, जेनिफर कूलिज आणि ऑब्रे प्लाझा या स्टार्सचा समावेश होता.

दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका हृतिक रोशनसोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. यात अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याशिवाय दीपिकाकडे 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट देखील आहे, ज्यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता दीपिका या चर्चांवर कधी मौन सोडणार आणि याबद्दल काय सांगणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"जय शिवाजी, जय भवानी"! शिवजयंतीदिवशी सांगेत मोठा उत्सव! छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे होणार लोकार्पण

VIDEO: एकाच वेळी 75 डॉल्फिन्स! मालवणच्या समुद्रात निसर्गाचा अद्भुत नजारा; ड्रोनमध्ये कैद झाले विलोभनीय दृश्य, पाहा व्हिडिओ

Goa Salt History: 1878चा ब्रिटिश-पोर्तुगीज तह होईपर्यंत गोव्यात 700 च्या वर मिठागरे होती; अस्तित्वाची जाणीव हीच खरी श्रीमंती

Arambol: 'मसाज पार्लर, स्पाचे परवाने रद्द करा'! हरमलवासीयांची पंचायतीवर धडक; पर्यटनस्थळ बदनाम होत असल्याचा दावा

पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या 'विकल्या' तर नोकरशाही जनतेची सेवा करणार की भ्रष्टाचार? पोसलेले अराजक नष्ट करण्यासाठी सुसंस्कार हवेत..

SCROLL FOR NEXT