Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone : दीपिकाच्या या 9 चित्रपटांनी कमावलेत 2700 कोटी..

अभिनेत्री दिपीका पदुकोणच्या या 9 चित्रपटांनी केली आहे बॉक्स ऑफिसवर 2700 कोटी इतकी जबरदस्त कमाई

Rahul sadolikar

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या जोरदार चर्चेत आहे. पठाण चित्रपटात दीपिकाच्या बिकीनीमुळे चांगलाच वाद ओढवला आहे. देशभरातल्या 7 राज्यात पठाणला विरोध होत आहे. बिहार राज्यात तर शाहरुख खान, दिपीकासह पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे ;पण अभिनेत्री दिपीका पदुकोणच्या या 9 चित्रपटांनी 2700 कोटी इतकी कमाई केली आहे हे तुम्हाला माहित आहे का?

  • कॉकटेल

    2012 साली दीपिका कॉकटेल या चित्रपटात सैफ अली खान आणि दियाना पेंटी यांच्यासह मुख्य भूमीकेत दिसली. या चित्रपटाचे बजेट 35 कोटी इतके होते पण या चित्रपटाने 127.7 कोटी एवढी तगडी कमाई केली. कॉकटेल चित्रपटाच्या गाण्यांनाही प्रेक्षकांनी दाद दिली.

  • 2013 साल ठरलं दिपीकासाठी ब्लॉकबस्टर

    2013 हे साल दिपीकासाठी ब्लॉकबस्टर ठरले. रेस 2, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, गोलियों की रासलीला रामलीला हे दिपीकाचे 4 चित्रपट तुफान चालले. 94 कोटी बजेट असताना रेस 2 ने 161 कोटी कमावले.

तर 40 कोटी रुपयांत बनलेल्या ये जवानी है दीवानीची इतकी 330 कमाई होती. 70 कोटी रुपयांत बनवल्या गेलेल्या चेन्नई एक्स्प्रेसने 423 कोटी कमावले. पुढे रिलीज झालेल्या गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटाने 201.4 इतकी कमाई केली तेही 88 कोटी इतकं कमी बजेट असताना

  • 2015 ला दिले तीन हीट चित्रपट

यावर्षी दिपीकाच्या 3 फिल्म हीट ठरल्या आणि त्यांनी तगडी कमाई केली. 2015 साली 150 कोटी बजेटच्या हॅप्पी न्यू इयर ने 408 कोटी कमावले. 145 कोटी बजेट असलेल्या बाजीराव - मस्तानी या चित्रपटाने 356 एवढा गल्ला जमवला

  • पद्मावतने विराध होऊनही कमावले 571

    पद्मावत हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण चित्रपट रिलीज होताच विरोध मावळला आणि चित्रपटाने 571 कोटी इतकी कमाई केली.

2021 साली दिपीकाचा छपाक रिलीज झाला पण या चित्रपटाला हवे तसे यश मिळु शकले नाही. या वर्षी दिपीकाचा गहराईया ओटीटी वर रिलीज झाला पण त्यालाही विशेष कमाई करता नाही आली. आता वादात अडकलेला दिपीकाचा पठाण काय कमाई करतोय पाहुया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT