Deepika -Ranvir Viral Video
Deepika -Ranvir Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika -Ranveer Viral Video : इंटरव्यू सुरू असताना रणबीरने मध्येच दीपिकाच्या ओठांवर... यूजर्स म्हणाले

Rahul sadolikar

ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन, दीपिका आणि रणवीर सिंगची केमिस्ट्री धमाल आहे. हे जोडपे त्यांच्या एकमेकांवर खुलेआम प्रेमाची उधळण करण्यात कुठेच कमी पडत नाही. त्यांचं हे प्रेम पाहुन त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद होतो. 

सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका मुलाखतीच्या मध्येच दीपिकाला किस करतो आणि तेथून निघून जातो. हा व्हिडीओ व्हायरल होताच दोघांच्या फॅन्सकडून कमेंटस सेक्शन कमेंट्सही भरून गेला आहे. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोण टाइम मासिकासाठी मुलाखत देताना दिसत आहे आणि रणवीर सिंग तिला सरप्राईज देण्यासाठी स्टुडिओमध्ये येतो. दोघेही एकमेकांचा हात धरतात आणि एकमेकांना थोडावेळ चुंबन (लिप लॉक) करतात आणि नंतर रणवीर निघून जातो. 

यावेळी दीपिकाने बेज रंगाचा पँटसूट तर रणवीरने काळ्या रंगाचा सूट आणि चष्मा घातला होता. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले, 'माय डिअर दीपवीर.' दुसर्‍या एका यूजरने लिहिले, 'आम्हीही रणवीरसाठी पात्र आहोत.'

हे कपल नुकतेच भूतानमधील सुट्टीवरून परतले, जिथे त्यांनी ट्रेकिंग, मंदिर भेटी आणि जेवणाचा आनंद घेतला. मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला की ती रणवीरसोबत अगदी नॅच्युरल फिल करते. तिने असेही सांगितले की ती त्यांच्यासोबत बांधल्यासारखं अनुभवत नाही. "मला असा अनुभव कधीच आला नाही कारण त्याने नेहमी मला, माझी स्वप्ने आणि माझ्या गरजा यांना प्रथम प्राधान्य दिलं" असं दीपिका म्हणाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT