Deepveer Dainik Gomantak
मनोरंजन

दिपीकाने केला रणवीर बद्दलाचा 'हा' मोठा खुलासा!

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीरसाठी एक कौतुकाची पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून प्रत्येक चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे. तिचे रणवीरवर इतके प्रेम का आहे हे तिने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे बॉलिवूडचे रोमांटिक कपल आहेत. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. दोघेही सोशल मीडियावरती कायम सक्रिय असतात आणि एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. आज दीपिकाने पती रणवीरच्या कौतुकात एक पोस्ट शेअर केली आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीरसाठी (Deepveer) एक कौतुकाची पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून प्रत्येक चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे. तिचे रणवीरवर इतके प्रेम का आहे हे तिने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

दीपिकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की- जो माणूस तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी शिकवतो, त्या तुम्हाला कळवल्याशिवाय कोणतीही गोष्ट आकर्षित करत नाही. ही पोस्ट शेअर करत दीपिकाने लिहिले – पतीची प्रशंसा पोस्ट. या पोस्टद्वारे दीपिकाने रणवीर सिंगचे कौतुक केले आहे. रणवीर तिला अनेक गोष्टी शिकवतो ज्याची तिला माहिती नाही. रणवीरकडून तिला अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्याचं, तिला समजलं आहे.

रणवीर आणि दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दोघेही कबीर खानच्या 83 चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत तर दीपिका त्याची पत्नी रोमीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कपिल देव यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी घरच्यांना सांगितले की, दीपिका रोमीची भूमिका साकारणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया संमिश्र असल्याचे त्यांनी सांगितले. कारण या चित्रपटात आपली भूमिका किती मोठी असणार आहे हे त्यांना माहीत नव्हते. रणवीर सिंग सध्या दिल्लीत त्याचा आगामी चित्रपट रॉकी रिंकी की प्रेम कहानीचे शूटिंग करत आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत. दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे, ती प्रभाससोबत पठाण, शकुन बत्राच्या चित्रपटात आणि नाग अश्विनच्या चित्रपटात लपकरच दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT