Debut film in the Indian Panorama section Alpha Beta Gamma Dainik Gomantak
मनोरंजन

इंडियन पॅनोरामा विभागातला डेब्यू चित्रपट 'आल्फा बीटा गामा’

कोरनाकाळाची (Covid-19) पार्श्वभूमी असलेला हा एक सुंदर चित्रपट आहे.

दैनिक गोमन्तक

'आल्फा बीटा गामा’ (Alpha Beta Gamma) हे शब्द ऐकताच आमच्या मनात शाळेत ओळख झालेल्या त्या तीन प्रकाश -किरणांची आठवण येते. नंतर विज्ञान पुस्तकातून किंवा इस्पितळात वैद्यकिय उपचार घेताना, त्यांच्याशी अधिक जवळीक झालेली असते. पण इथं आपण त्याबद्दल बोलत नाही आहोत. शंकर श्रीकुमारचा हा प्रथम पदार्पणाचा चित्रपट आहे. कदाचित आल्फा, बीटा, गामा हे शब्द या चित्रपटात असलेल्या जय, मालती आणि रवी या तीन पात्रांकडे संबंध जुळवतही असतील. कोरनाकाळाची पार्श्वभूमी असलेला हा एक सुंदर चित्रपट आहे.

जयची दिग्दर्शकीय कारकिर्द खूप छान आकार घेते आहे. मात्र त्याचं लग्न एका नाजूक वळणावर येऊन ठेपलं आहे आणि तो आपली मैत्रीण कैरा बरोबर आपले जीवन व्यतीत करायला पाहतो आहे. जयची बायको मितालीला घटस्फोट हवा आहे कारण तिला आपल्या इंजिनियर मित्राबरोबर, रवीबरोबर लग्न करायचे आहे. रवी काळजी घेणारा आणि विचारी असा पुरुष आहे, जयच्या अगदी उलट. जय जेव्हा घटस्फोटासंबंधी बोलणी करायला जातो तेव्हा, रवी तिथेच असतो.

त्याचा फ्लॅटवर हा फ्लॅट एकेकाळी जय आणि मितालीचे घर होते, ‘तल्लीगल्ली’. आपल्यासमोर घटस्फोटाची बोलणी करणे त्या दोघांना कठीण होईल म्हणून रवी तिथून निघून जायचे ठरवतो. मितालीच्या आयुष्यातून अशातऱ्हेने एक पुरुष जाऊन दुसरा यायचाच असतो. तेव्हाच कोरोना लॉकडाऊन हस्तक्षेप करतो. आता ते तिघेही, प्रेमभावनेचे पिडीत, त्या छपराखाली अडकून राहतात आपल्यालाकाय हवं आणि कुठल्या किंमतीवर या प्रश्‍नाशी संघर्ष करत. त्यांना बाहेरची वाट बंद झालेली असते.

‘आल्फा बीटा गामा’ हा अतिशय वेधक आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे. 52 व्या इप्फीच्या ‘इंडियन पॅनोरामा’ विभागात फक्त दोन हिंदी चित्रपट आहेत आणि हा त्यापैकी एक दुसऱ्या हिंदी चित्रपटाचे नाव आहे, ‘एट डाऊन तुफान मेल’. या विभागातल्या सिनेमांचे स्क्रिनिंग 21 नोव्हेंबर रोजी सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

SCROLL FOR NEXT