Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

DDLJ Box Office Collection : डीडीएलजेची जबरदस्त कमाई, व्हॅलेंटाईन वीकमध्ये राज-सिमरनची प्रेमकथा पुन्हा हिट

Rahul sadolikar

शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूप चांगलं ठरलेलं आहे. शाहरुखचा पठाण अनेक रेकॉर्ड रचत असुन आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. राज आणि सिमरनची ही खूप गोड प्रेमकथा आहे. आजही हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिरात सुरू असून प्रेक्षकांना तो आवडतो.

 या चित्रपटाद्वारे शाहरुख खान रोमान्सचा किंग बनला, तर या चित्रपटानंतर शाहरुख आणि काजोलची जोडी चांगलीच पसंतीस उतरली आणि ही जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान ठेवून आहे. या चित्रपटाच्या रिलीजला जवळपास 28 वर्षे उलटून गेली आहेत, पण राज आणि सिमरन अजूनही चाहत्यांची पहिली पसंती आहेत. 

व्हॅलेंटाईन डेच्या खास आठवड्यात काही रोमँटिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये डीडीएलजेचाही समावेश आहे. PVR, Inox आणि Sinopolis सारख्या राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आता DDLJ 16 फेब्रुवारीपर्यंत थिएटरमध्ये चालणार आहे. डीडीएलजे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केल्याने प्रेक्षकांसाठी २८ वर्षांच्या आठवणी परत आल्या. अवघ्या 2 दिवसांत या चित्रपटांनी लाखोंची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 2.50 लाखांची कमाई झाली. 11 फेब्रुवारी 2023 रोजी त्यात मोठा नफा दिसला. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये 10 लाखांचा व्यवसाय केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या दिवशीही चित्रपटाचा 10 लाखांचा व्यवसाय आहे. म्हणजेच तीन दिवसांत त्याची एकूण कमाई 22.5 लाख रुपये आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी हा चित्रपट 20 लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय करू शकतो, असा विश्वास आहे. एकूणच या व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट ६० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT