David Beckham Instagram
मनोरंजन

David Beckham: दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पोहचला किंग खानच्या घरी Viral Video

दैनिक गोमन्तक

David Beckham: सध्या सुपरस्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारताच्या दौऱ्यावर आहे. नुकतीच सोनम कपूरच्या घरी डिनर पार्टी झाल्यानंतर बेकहॅम गुरुवारी रात्री शाहरुख खानच्या घरी मन्नतला पोहोचला. शाहरुखने फुटबॉलपटूच्या स्वागतासाठी एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीला उपस्थित असलेले कोणतेही पाहुणे पापाराझीसाठी पोज देण्यासाठी तेथे थांबले नाहीत. मात्र बेकहॅम 'मन्नत'च्या आत जातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कार 'मन्नत'च्या दिशेने जाताना दिसत आहे, ज्यामध्ये बेकहॅम त्याच्या स्टाफसोबत दिसत आहे. नुकताच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या आयसीसी विश्वचषक 2023 सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी हा फुटबॉलपटू मुंबईला पोहोचला होता.

या सामन्यानंतर फुटबॉलपटूला सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या घरी डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते. सोनम कपूरचे कुटुंब आणि नातेवाईकांव्यतिरिक्त तिने बॉलिवूडमधील काही जवळच्या मित्रांनाही या पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

याशिवाय बेकहॅमने बुधवारी अंबानी कुटुंबियांचीही भेट घेतली आणि त्यांना मुंबई इंडियन्सची जर्सी भेट म्हणून देण्यात आली. बेकहॅम हे युनिसेफचे सदिच्छा दूत आहेत.

दरम्यान,  बेकहॅम जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. त्याने राष्ट्रीय स्तरावर इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 1996-2009 पर्यंत 100 हून अधिक सामने खेळले आहेत. मिडफिल्डरने त्याच्या कारकिर्दीत मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद, एसी मिलान, पॅरिस सेंट-जर्मेन आणि एलए गॅलेक्सी यासारख्या फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. या क्लबसह, त्याने प्रीमियर लीग, ला लीगा, लीग 1 आणि UEFA चॅम्पियन्स लीग विजेतेपदांसारखे अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा पुढचा चित्रपट राजकुमार हिरानीच्या 'डिंकी' चित्रपटात दिसणार आहे, जो 2023 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT