Rapper Badshah  Dainik Gomantak
मनोरंजन

Badshah New Song : बादशाहच्या गाण्याविरोधात तक्रार दाखल...नेमकं काय आहे प्रकरण?

रॅपर बादशाहच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Rahul sadolikar

रॅपर बादशाह एका गाण्यामुळे अडचणीत आला आहे. बादशाह एकामागून एक हिट गाणी देण्यासाठी ओळखला जातो. मात्र यावेळी तो वादामुळे चर्चेत आला आहे. यावर्षी रिलीज झालेल्या त्याच्या 'सनक' गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

 मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका हिंदुत्ववादी संघटनेने या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. रॅपरविरोधात तक्रार दाखल करताना त्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. चला हे गाणं नेमकं काय आहे? हे पाहुया

'डीजे वाले बाबू' आणि 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बादशाहविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदूरच्या 'परशुराम सेना' नावाच्या संघटनेने 'सनक' गाण्यात 'भोलेनाथ' शब्द चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप केला आहे. 

'सनक' हे अपशब्दांनी भरलेले गाणे असून त्यात भोलेनाथ हा शब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्याचवेळी एमजी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष सिंह म्हणाले की, हिंदूत्ववादी संघटनेने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रॅपरविरोधात तक्रार दाखल केली आहे. ते या प्रकरणी चौकशी करतील आणि त्यानंतरच अधिक माहिती देऊ शकतील. 

बादशाहचे 'सनक' (बादशाह सनक गाणे) हे गाणे खूप लोकप्रिय गाणे आहे, ज्याला लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत आणि इंस्टाग्रामवर या गाण्याची खूपच चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT