Comedian Tirthanand who imitated Nana Patekar attempted suicide

 

Dainik Gomantak

मनोरंजन

नाना पाटेकरांची नक्कल करणाऱ्या कॉमेडियन तीर्थानंदचा आत्महत्येचा प्रयत्न

नाना पाटेकरांची नक्कल करणाऱ्या तीर्थानंदचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकरांची (Nana Patekar) नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कॉमेडियन तीर्थानंद राव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्थिक अडचणींमुळे तीर्थानंद (Tirthanand Rao) यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, शेजाऱ्यांनी वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे तीर्थानंद यांचे प्राण वाचले. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीर्थानंद यांनी 27 डिसेंबरच्या संध्याकाळी विष प्राशन केले होते. चार दिवस ते रुग्णालयात होते आणि आता त्यांची प्रकृती सुधारत आहे.

रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत तीर्थानंद यांनी विष प्यायल्याची कबुली दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तीर्थानंद सांगतात आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना सोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार होय, मी विष प्यायले होते आणि माझी प्रकृती गंभीर होती. आर्थिक विवंचनेसोबतच माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला सोडले, असे तीर्थानंद म्हणाले होते.

बायकोही गेली निघून

"मी हॉस्पिटलमध्ये होतो, पण माझी आई आणि भाऊ मला भेटायलाही आले नाहीत, आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि मी गेल्या 15 वर्षांपासून येथे राहत आहे, पण माझे कुटुंब माझ्याशी बोलतही नाही. एवढेच नाही तर त्यांनी माझ्या उपचारासाठी एक पैसाही खर्च केला नाही. मी कर्जात आहे. हॉस्पिटलमधून आलो असूनही मी घरी एकटाच राहतो. यापेक्षा वाईट कोणाची असू शकते. माझ्या आईसुद्धा मला जेवणासाठी विचारले नाही." अशी खंत तीर्थानंद यांनी व्यक्त केली.

आपल्या पत्नी आणि मुलीबद्दल बोलताना तीर्थानंद म्हणाले की, "मी जच्याशी लग्न केले ती एक नृत्यांगना आहे. आम्हाला एक मुलगीही आहे, पण माझ्या पत्नीने दुसरे लग्न केले. माझ्या मुलीचेही लग्न झाले आहे. मात्र माझा त्यांच्याशी संपर्क नाही."

तीर्थानंद हे नाना पाटेकर यांच्यासारखेच आहेत. नाना पाटेकरची नक्कल करतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर तीर्थानंद कॉमेडियन कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोचाही (Kapil Sharma Show) भाग होते. या शोमध्ये तीर्थानंद नाना पाटेकरची नक्कल करताना दिसले होते त्यावेळी प्रेक्षकांना त्यांचा हा अभिनय खूप आवडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT