Rajpal Yadav  Twitter
मनोरंजन

राम गोपाल वर्माच्या 'जंगल'ने केले राजपाल यादवचे जीवन 'मंगल'!

राजपालने दूरदर्शनच्या 'मुंगेरी लाल के भाई नौरंगी लाल' या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा कॉमेडियन बादशाह राजपाल यादव (Rajpal Yadav Birthday) आज 16 मार्च रोजी त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. राजपाल यादवचा जन्म उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे झाला. यूपीमधून आलेल्या राजपाल यादवने आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी कधी चढ-उतार येतात पण त्याने नेहमीच आपल्या विनोदी शैलीने चाहत्यांना हसवले आणि खिळवून ठेवले आहे. या अभिनेत्याने दूरदर्शनच्या मुंगेरी लाल के भाई नौरंगी लाल या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजपाल यादवचा जीवन बदलणारा चित्रपट जंगल आणि त्यानंतर तो बॉलिवूडचा कॉमेडी किंग म्हणून उदयास आला.

राजपाल यादवने 'दिल क्या करे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिला चित्रपट काही खास नव्हता, पण नंतर राम गोपाल वर्माच्या जंगल या चित्रपटाने अभिनेत्याच्या आयुष्याला गती मिळाली. राजपाल यादवने पुन्हा हम किसी से कम नहीं, चोरी-चोरी चुपके-चुपके, हंगामा, मुझसे शादी करोगी, मैं मेरी पत्नी और वो, अपना सपना मनी मनी, हेराफेरी, भूल- भूलैयासारख्या 100 चित्रपटात आपला विनोदी अभिनय दाखवला आहे.

राजपाल यादव त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत होता. अभिनेत्याची प्रेमकथाही त्याच्यासारखीच अनोखी आणि हटके आहे. राजपाल यादव एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता, तेव्हा तिथे त्याची राधाशी भेट झाली. राधा आणि राजपाल यादव बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजपाल यादवचे राधासोबतचे हे दुसरे लग्न आहे, याआधी त्याने करुणासोबत लग्न केले होते. करुणाच्या मृत्यूनंतर त्याने राधाशी लग्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT