Parag Kansara Death Dainik Gomantak
मनोरंजन

Comedian Parag Kansara Death : विनोद विश्वाला धक्का; राजू श्रीवास्तवनंतर अजून एका कॉमेडियनची एक्झिट

Parag Kansara Death : प्रसिद्ध विनोदी अभिनेता पराग कंसारा या जगात राहिले नाहीत.

दैनिक गोमन्तक

Parag Kansara Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्याचवेळी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर आता विनोदी जगतातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. अलीकडेच आणखी एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता पराग कंसारा या जगात राहिले नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

(Comedian Parag Kansara Death)

ते 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' आणि 'किंग ऑफ कॉमेडी' या शोच्या पहिल्या सीझनचा भाग होते. नुकताच कॉमेडियन सुनील पालने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की आमचे पार्टनर पराग कंसारा आता आमच्यासोबत नाहीत. सुनील पालने पराग यांच्या जाण्याबाबत शोक व्यक्त केला आहे.

या व्हिडीओमध्ये सुनील पाल बोलत आहेत की, कॉमेडीच्या दुनियेत आमचं लक्ष कोणी वेधून घेतलं हे मला माहीत नाही. या व्हिडिओमध्ये कॉमेडियनला भाभी जी घर पर है अभिनेता दीपेश भानचीही आठवण झाली.

दरम्यान, आपल्या मजेदार जोक्सने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे 59 व्या वर्षी निधन झाले आहे. बुधवारी त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT