Bharti Singh Apologises Danik Gomantak
मनोरंजन

भारती सिंहला पुन्हा मागावी लागली माफी, काय आहे प्रकरण

मला तुमची बहीण समजून माफ करा, भारती सिंह

दैनिक गोमन्तक

दाढी मिशांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल कॉमेडियन भारती सिंगने माफी मागितली आहे. सोमवारी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला आणि तीने फक्त कॉमेडी करत असल्याचे सांगितले. भारती म्हणाली की, मी कॉमेडी लोकांना खूश करण्यासाठी करते, कोणाचे मन दुखवण्यासाठी नाही. (comedian bharti singh apologises after her old video mocking daadi mooch goes viral)

माझ्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मला तुमची बहीण समजून माफ करा, अस ती म्हणाली. अलीकडेच भारती सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती दाढी मिशांबद्दल कॉमेडी करताना दिसत होती.

भारतींच्या या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. ट्विटरवरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याशिवाय शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) भारती सिंह यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचेही सांगितले आहे. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून भारती सिंगने एक निवेदन जारी करून संपूर्ण चित्र आपल्या बाजूने साफ केले आहे आणि आपले स्पष्टीकरण सादर करताना माफी मागितली आहे.

मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, असे भारती सिंहने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तुम्हीही तो व्हिडिओ पहा, असे आवाहन तीने लोकांना केले आहे. ती म्हणाली, "मी कोणत्याही धर्म किंवा जातीबद्दल कुठेही असे म्हटले नाही की, या धर्मातील लोक दाढी ठेवतात आणि ही समस्या आहे. तुम्ही व्हिडिओ पहा. मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते... पण माझ्या एका शब्दाने काही धर्माच्या लोकांची मने दुखावली आहेत, त्यामुळे मी हात जोडून माफी मागत आहे." भारती सिंहने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती स्वतः पंजाबी असून तिचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. त्यामुळे ती पंजाबचा पूर्ण सन्मान करते. मला पंजाबी असल्याचा अभिमान असल्याचेही तीने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT