Deepika Padukone and Ranveer Singh  Dainik Gomantak
मनोरंजन

रणवीरने लग्नासाठी विचारताच दिपीकाच्या आईला धक्काच बसला होता... कॉफी विथ करनमध्ये दीपवीरने सांगितला किस्सा

कॉफी विथ करनमध्ये नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि दिपीकाने आपल्या नात्यातल्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

Rahul sadolikar

Deepika Ranveer Singh in Coffee with Karan : अभिनेता रणवीर सिंह आणि दिपीका पदुकोण हे इंडस्ट्रीतील एक क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. आपापल्या यशस्वी करिअरसोबत दोघांनी एकमेकांसोबत आपले वैवाहिक आयुष्यही सुखी आहे हे आतापर्यंत तरी सिद्ध केले आहे.

दीपिका आणि रणवीर नुकतेच कॉफी विथ करनमध्ये पोहोचले होते. या शोमध्ये दोघांनी आपले लग्न कसे जमले याचा किस्सा शेअर केला आहे.

दीपिका रणवीरने सांगितले केमिस्ट्रीबद्दल

'कॉफी विथ करण 8' या चॅट शोमध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते. सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये ही जोडी आपल्या जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसली आहे. 

इतकेच नाही तर पहिल्यांदाच रणवीरने त्याच्या गुप्त प्रेमकथेवर मौन सोडले आहे. दीपिका आणि तिच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया शेअर करून रणवीर चर्चेचा भाग बनला आहे. 

लग्नाचा व्हिडीओ केला शेअर

दीपवीरने 'कॉफी विथ करण 8' मध्ये आपल्या ऐतिहासिक लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांची मने जिंकली. 

याशिवाय, रणवीर सिंग देखील त्यांचा सुरुवातीचा प्रणय, चित्रपटाच्या सेटवर एकमेकांबद्दल प्रेम वाटणे आणि अगदी पहिल्यांदाच त्यांचा रोमँटिक प्रस्ताव शेअर करून देखील प्रकाशझोतात आला आहे. 

गेल्या आठवड्यात, शोमधील एक क्लिप लीक झाली होती ज्यामध्ये रणवीरने उघड केले की त्यांनी लग्नाच्या तीन वर्षांपूर्वी डीपीला एक विशेष प्रश्न विचारला होता. 

करण म्हणाला

करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण 8' च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने मालदीवमधील त्याच्या अनोख्या प्रपोझलबद्दल तपशीलवार माहिती दिली. 

रणवीर म्हणाला, 'आम्ही सुट्टीवर जात होतो आणि मी ठरवलं की सुट्टीच्या दिवशी मी दीपिकाला प्रपोज करेन. 

मला अंगठी मिळाली आणि आम्ही मालदीवला गेलो आणि मी गुपचूप ती अंगठी माझ्यासोबत घेतली आणि मी तिथे हे साहस केले. 

असं जमलं लग्न

लग्नाच्या प्रस्तावाविषयी माहिती देताना रणवीर म्हणाला, 'समुद्राच्या मध्यभागी फक्त मी आणि दीपिका होतो, मी तिला प्रपोज केले आणि ती खूप भावूक झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे ती हो म्हणाली. यानंतर आमची एंगेजमेंट झाली. मात्र, दीपिकाची समजूत काढल्यानंतर रणवीरला तिच्या पालकांशी बोलायचे होते तेव्हा मात्र तो खूप घाबरला होता. 

बंगळुरूमध्ये दीपिकाच्या कुटुंबियांशी बोललेल्या त्या खास दिवसाची आठवण करून देताना रणवीर म्हणाला की दीपिका त्याच्या कानात कुजबुजली होती की ती घरच्यांना याबद्दल सांगणार आहे. .यावर रणवीर म्हणाला, मला तिने असं करू नये असे वाटत होते. याचा विचारही करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

SCROLL FOR NEXT