Shahrukh - Salman Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh - Salman : बँडेज बांधून आलेल्या जवानांनी टायगर 3 चं पोस्टर फाडलं... शाहरुख - सलमानचे चाहते एकमेकांना भिडले..

अभिनेता सलमान खान आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्ये एका थिएटरबाहेर मोठा राडा पाहायला मिळाला आहे.

Rahul sadolikar

Clash between Shah Rukh - Salman's fans : शाहरुख खान आणि सलमान खान हे बॉलीवूडचे दोन मोठे सुपरस्टार. 90 च्या दशकात जेव्हा शाहरुख दिल्ली सोडून मुंबईत आला तेव्हा सलमान खानच्या घरी राहिला होता.

दोघांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून चांगली मैत्री आहे. मध्यंतरी काही गैरसमजामुळे दोघांंमध्ये दुरावा आला होता ;पण आता दोघांमध्येही पूर्वीसारखाच तो बंध टिकून राहिला आहे.

असं असलं तरी दोघांचे वेडे चाहते मात्र एकमेकांना शत्रू समजतात. याची प्रचिती नुकतीच आली आहे. एका थिएटर बाहेर शाहरुख - सलमानच्या चाहत्यांनी चांगलाच राडा घातला आहे.

पोलिसांना पाचारण करण्याची वेळ

शाहरुख आणि सलमानचे अनेक चाहते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांशी भिडतात दिसतात ;पण आज दोघांच्या फॅन्सची कहरच केला. झालेला हा प्रकार सोशल मीडियावरचा नसून सिनेमा हॉलमधला आहे. 

वास्तविक, शाहरुख खान(Shahrukh Khan ) आणि सलमान खानचे (Salman Khan) चाहते एकमेकांना भिडले. परिस्थिती एवढ्या टप्प्यावर पोहोचली की, पोलिसांना प्रकरण मिटवण्यासाठी यावे लागले.

थिएटरमध्येच राडा

शाहरुखचे चाहते 'जवान' च्या बँडेज बांधलेल्या अवतारात चित्रपटगृहात पोहोचले तेव्हापासूनच वादाला सुरूवात झाली. थिएटरमध्ये आलेल्या शाहरुखच्या फॅन्सनी तोंडावर पट्टी बांधली होती. 'जवान'च्या या चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर उपस्थित असलेल्या सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाचे पोस्टर फाडण्यास सुरुवात केली. 

यानंतर वातावरण इतके तणावपूर्ण बनले की पोलिसांना पाचारण करावे लागले. बँडेज बांधलेल्या या 'तरुण' चाहत्यांना पोलिसांनी पळवून नेले आहे. या प्रसंगाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ #JawanTsunami हॅशटॅगसह शेअर करण्यात आला आहे.

शाहरुख - सलमानचे चाहते भिडले

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार महाराष्ट्रातील ठाणे इथ घडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत सांगण्यात आले आहे की, ठाण्यातील एका थिएटरमध्ये शाहरुख आणि सलमान खानच्या चाहत्यांमध्ये जोराचं भांडण सुरू झालं. 

पांढऱ्या पट्टीने तोंड झाकलेल्या शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या 'टायगर 3'चे पोस्टर्स फाडले. सलमान खानच्या चाहत्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे, त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढले.

तुम्हाला सांगतो की सलमान खान 2010 पासून 'दबंग', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. तर शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून अपयशाचा सामना करत होता आणि 'पठाण', 'जवान'ने त्याला त्यातून सोडवले आहे. आता या गोष्टींवरून त्यांचे चाहते सोशल मीडियावर भांडताना दिसतात.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT