Citadel Global Series  Dainik Gomantak
मनोरंजन

Citadel Global Series : 'या' कारणामुळे रुसो ब्रदर्स यांनी 'सिटाडेल' ही ग्लोबल सिरीज बनवली

सिटाडेल ही ग्लोबल सिरीज का बनवली या बद्दल सांगितायत रुसो ब्रदर्स.

Rahul sadolikar

जो आणि अँथनी रुसो यांनी आजवर काही मोठे आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत, ज्यामध्ये जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, आकर्षक कथानक असून, एपिक अ‍ॅक्शनसाठी त्यांचं खूप कौतुक केल गेलं.

आता या जोडीची 'सिटाडेल'ही उत्कृष्ट ग्लोबल सिरीज दर्शकांच्या भेटीला येणार आहे ज्यामध्ये रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली आहे यात शंका नाही. अलीकडेच, या सीरिजबद्दल बोलताना रुसो ब्रदर्स यांनी सांगितले कि या शोद्वारे ग्लोबल सिरीज बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

"आम्ही विचार केला कि एका नरेटिवसाठी हा एक नवा विचार होता तसेच, स्टोरीटेलर्सची ग्लोबल कम्यूनिटी बनवण्याचा हा उत्तम मार्ग ठरेल. एक मोठी मोज़ेक स्टोरी एकत्र करणे.

आम्ही इतर चित्रपटांवर काम करण्यात आणि जगभर फिरण्यात वेळ दिल्यानंतर, मला वाटते की अँथनी आणि माझ्यासाठी ही कल्पना खरोखरच रोमांचक होती आणि आम्हाला एक प्रकारचे आव्हान स्वीकारण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहित केले."

"जो आणि मी यासारखी कल्पना यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. जेन सल्के अमेझॉन स्टुडिओचे प्रमुख यांच्या दूरदर्शी दृष्टीचे खरे श्रेय आहे. की त्या आम्हाला कल्पना देतील, मुळात एका शोचे मॉडेल जे इतके महत्त्वाकांक्षी, व्यापक आणि जागतिक स्वरूपाचे होते. हे असे काहीतरी आहे ज्यावर मी आणि जो अनेक वर्षांपासून काम करत आहोत.

स्टोरीटेलर म्हणून, आम्हाला ग्लोबल फिल्म कम्युनिटीचा सहभाग खरोखर आवडतो. ही एक अद्भुत संधी आहे. आम्ही आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकणारी योग्य कथा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. यात आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही सहकाऱ्यांचे आभारी आहोत

या 6 भागांच्या सिरीजमध्ये प्रियांका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडन यांच्यासह स्टॅनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील आहेत. रूसो ब्रदर्सच्या एजीबीओ आणि शोरनर डेव्हिड वीलद्वारा यांनी एक्जीक्यूटिव-निर्मित, 'सिटाडेल'चा प्रीमियर 28 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे आणि 26 मे पर्यंत दर आठवड्याला सिरीजचा एक भाग प्रसारित केला जाईल. हि ग्लोबल सिरीज इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह 240 देश आणि प्रदेशांसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT