Brahmastra Sequal Release Date Dainik Gomantak
मनोरंजन

Brahmastra Sequal Release Date: या दिवशी रिलीज होणार ब्रह्मास्त्र चा सिक्वल...अखेर आयान मुखर्जी बोललाच

अभिनेता रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रचा सिक्वलची रिलीज डेट आयान मुखर्जीने सांगितली आहे.

Rahul sadolikar

सप्टेंबर 2022 मध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूर-आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली हा लोकांच्या प्रेमाचा चमत्कार होता. 'ब्रह्मास्त्र'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जी लवकरच या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भाग घेऊन येत आहे. त्याने रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

अयान मुखर्जीने मंगळवारी 'ब्रह्मास्त्र'च्या सिक्वेलचे अपडेट शेअर केले. ' ब्रह्मास्त्र'च्या सिक्वेलचे शूटिंग एकाच वेळी होणार असल्याचे सांगत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. सिक्वेल दोन भागात बनवला जाईल, पण दोन्ही वेगवेगळ्या वेळी रिलीज होतील. मात्र, या दोघांच्या रिलीज डेटमध्ये फार काळ अंतर असणार नाही.

त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, 'ब्रह्मास्त्र: अस्त्रावर बोलण्याची वेळ आली आहे. मला भागावर मिळालेल्या प्रेमानंतर, मी भाग दोन आणि तीन बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे मला माहित आहे की भाग एक पेक्षा मोठा आणि महत्वाकांक्षी असेल. 

आम्ही ठरवले आहे की दोन्ही सिक्वेल एकाच वेळी शूट केले जातील परंतु ते वेगवेगळ्या वेळी प्रदर्शित केले जातील. यासोबतच त्याने आणखी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाची माहितीही दिली. मात्र, या चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आलेले नाही.

यासोबतच अयान मुखर्जीने सांगितले की, ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दोन सिक्वेल डिसेंबर 2026 आणि डिसेंबर 2027 मध्ये रिलीज होतील. पहिल्या भागामध्ये जिथे शिवाची कथा दाखवण्यात आली होती, तिथे दुसऱ्या भागाची कथा देवावर आधारित असेल. तिसर्‍या भागाची कथा कोणासोबत बनवली जाईल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ब्रह्मास्त्रला मिळालेला चाहत्यांच्या प्रतिसाद बघता आता याच्या दोन्ही भागांना चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही. रणबीर कपूर आणि अलिया भट्टला या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT