दक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडवर भारी पडत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुरुवारी (30 मार्च) बॉक्स ऑफिसवर दक्षिण विरुद्ध बॉलीवूड असा जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. एकीकडे हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगणचा 'भोला' सिनेमा रिलीज झाला आहे.
तर दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार नानीचा मोस्ट अवेटेड 'दसरा' हा सिनेमाही रिलीज झालाय. दरम्यान, 'भोला' आणि 'दसरा' यापैकी कोणत्या चित्रपटाने कमाई केली आहे. याबद्दल जाणून घेऊया.
बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'भोला' या सिनेमाची बरीच चर्चा आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल अशी आशा होती. मात्र दुसऱ्या दिवशी 'भोला'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाली आहे.
प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'भोला'च्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. तरणच्या मते, पहिल्या दिवशी 11.20 कोटींचे बंपर कलेक्शन करणाऱ्या 'भोला'ने दुसऱ्या दिवशी 7.80 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 18.60 कोटींवर गेली आहे.
'दसरा'ने 'भोला'ला टाकले मागे
दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार नानीचा चित्रपट 'दसरा' ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, साऊथच्या 'दसरा' चित्रपटाने ओपनिंग दिवशी सर्व भाषांत 23.2 कोटींची कमाई केली आहे.
मात्र रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'दसरा'च्या कमाईत घट झाली असून, त्यामुळे 'दसरा' दुसऱ्या दिवशी 9.75 कोटींचा व्यवसाय करू शकला. 'दसरा'चे एकूण कलेक्शन 32.95 कोटी झाले आहे. ज्यावरून नानीचा 'दुसरा' अजय देवगणच्या 'भोला'च्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.