Box Office Collection: शाहरुख खानचा 'जवान' आणि सनी देओलचा 'गदर 2' या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. आता या दोन चित्रपटानंतर अनेक छोटे-छोटे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत, त्यातील अनेक चित्रपट सुरू होताच अपयशी ठरले आहेत.
गेल्या आठवड्यात सनी देओलचा मुलगा राजवीर देओलचा 'दोनो' हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र तो बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची अवस्थाही बिकट आहे, पण या दोन चित्रपटांबरोबर रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. जाणून घेऊयात पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफीसवर या तिन्ही चित्रपटांनी किती कमाई केली आहे.
या तीन चित्रपटांपैकी राजवीर देओल आणि पूनम ढिल्लन यांची मुलगी पलोमा ढिल्लन यांच्या 'दोनो' या चित्रपटाचा परफॉर्मन्स सर्वात खराब झाला आहे. सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने सोमवारी नगण्य कमाई केली आहे.
समोर आलेल्या माहीतीनुसार, 'दोनो' चित्रपटाने पहिल्या दिवशी 35 लाखांची कमाई केली होती आणि शनिवार-रविवारी प्रत्येकी 30 लाखांची कमाई केली होती. अशाप्रकारे, चित्रपटाने केवळ 95 लाखांची कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत 1 कोटींचीही कमाई करू शकला नाही.
बॉक्स ऑफीसवर 'थँक यू फॉर कमिंग' ची काय आहे स्थिती?
महिलांच्या लैंगिक सुखाच्या इच्छेची कथा सांगणारा 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.लोकांना चित्रपटाची कथा फारशी आवडलेली नाही. अनिल कपूरचा जावई करण बुलानी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या सोमवारी केवळ 35 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसांत 4.77 कोटींची कमाई केली आहे.
तीन दिवसांत जगभरात 5.70 कोटी रुपयांची कमाई
भूमीच्या या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, तीन दिवसांत 5.70 कोटी रुपये कमावले आहेत.
'मिशन राणीगंज'
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा 'मिशन राणीगंज' या तिन्ही चित्रपटांपेक्षा चांगली कमाई करत आहे. 'मिशन राणीगंज' ही 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोलफिल्डच्या कोसळण्याच्या वेळी जमिनीखाली अडकलेल्या 65 खाण कामगारांची दुःखद कहाणी आहे.
अभियंता जसवंत सिंग गिल (कॅप्सूल सिंग) यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले होते आणि अक्षय कुमारला या भूमिकेत सर्वजण पसंत करत आहेत. पहिल्या सोमवारी या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण 4 दिवसांत 13.85 कोटींची कमाई केली आहे.
जगभरात 15 कोटींचा आकडा पार केला
या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 3 दिवसांत 15.90 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत भारतातील एकूण संकलन 14.90 कोटी रुपये होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.