Bollywood News : Aamir Khan preparing for third marriage after second divorce  aamir.khan_azerbaijan/Instagram
मनोरंजन

दुसऱ्या घटस्फोट नंतर तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आमिर खान..!

अमीर खान सोबत आता या अभिनेत्रीची चर्चा..

दैनिक गोमन्तक

Bollywood News : बॉलीवूड अभिनेता अमीर खानच्या लग्नाची चांगलीच चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे. आमिर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाची घोषणा करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वर्षी ऑगस्टमध्ये आमिर खानने किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा करून संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का दिला होता. किरण स्वतः एक चित्रपट निर्माती होती. दोघांनी डिसेंबर 2005 मध्ये लग्न केले होते दरम्यान हे जोडपे इंडस्ट्रीतील परफेक्ट जोडप्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांसाठी एक मोठा धक्का होता. दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव आझाद आहे. एवढेच नाही तर किरण राव आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताची मुले इरा आणि जुनैद यांच्या खूप जवळ आहे.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, आमिर 'लाल सिंह चड्ढा' नंतर लगेचच त्याच्या लग्नाची घोषणा करणार आहे. आपल्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबाबत कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठीच अभिनेता हे करत आहे. इतकंच नाही तर आमिर त्याच्या आधीच्या चित्रपटांतील त्याच्या कोणत्याही सहकलाकाराशी लग्न करू शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

फातिमा आणि आमिर एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आमिर खानला ती एक व्यावसायिक म्हणून आवडते, त्यामुळे अभिनेत्रीही त्याला आपला गुरू मानते. 'दंगल'नंतर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये दोघे एकत्र काम करताना दिसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT