कंगना आणि करण Dainik Gomantak
मनोरंजन

कंगना-करणमध्ये पुन्हा वादाची ठिणगी,व्हिडिओ झाला व्हायरल...

कंगना (Kangana) स्टेज सोडू लागते आणि त्यावेळी करण कंगनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो, ज्याकडे अभिनेत्री (Actress) दुर्लक्ष करते आणि पुढे जाते.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच वादग्रस्त विधानावरुन चर्चेत असते. ती बऱ्याच मुद्द्यावर आपले मत मांडताना अनेकदा दिसते. सध्या कंगना आणि करण जोहर यांच्यात वाद पहावयास मिळत आहे. हा वाद कंगनाने करणच्या शोमध्ये त्याला मरलेला टोमणा तेथून सुरु झाला, आणि तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

कंगना अनेकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते. ती अनेकदा चित्रपट माफियाच्या लोकांना लक्ष्य करताना दिसते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फिल्मफेअर पुरस्काराचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे.

करण हा अवॉर्ड शो होस्ट करताना दिसत आहे आणि कंगनाला अवॉर्डसाठी (award) कॉल करतो. पुरस्कार मिळाल्यानंतर, कंगना स्टेज सोडू लागते आणि त्यावेळी करण कंगनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो, ज्याकडे अभिनेत्री दुर्लक्ष करते आणि पुढे जाते. कंगनाने लिहिले, हाहाहा माझा स्वभाव आधीच खराब आहे. अभिनेत्रीने दुसर्‍या पोस्टमध्ये लिहिले की, हे माझे इंडस्ट्रीतील पहिले वर्ष आहे, मी किशोरवयीन होते पण वृत्ती एकच होती.

कंगनाने करणवर घराणेशाही आरोप

2017 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शोमध्ये कंगनाने चित्रपट निर्माता करण जोहरला बॉलीवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचे वर्णन केले होते, त्यानंतर देशभरात मोठी चर्चा झाली आणि ती आजपर्यंत सुरू आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या सोशल मीडियावर चित्रपट माफियांशी पंगा घेताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रावणी पावसात ‘उटा’चे इंद्रधनुष्य; ‘एकीचे बळ’समोर आडकाठींची हार

Mathematics Teaching Methods: गणिताची भीती दूर करा, विद्यार्थ्यांना आकड्यांच्या सौंदर्याची ओळख करून द्या

IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान महामुकाबला; 19 ऑगस्टला रंगणार थरार, सामना LIVE कुठे पाहता येणार?

Sanjivani Sugar Factory: साखरेच्या गोडीमागची कडू कहाणी; 7 वर्षांपासून बंद ‘संजीवनी’ला मिळणार का नवजीवन?

Crime News: लिव्ह-इन पार्टनरचा गळा चिरला, मृतदेह 18 तास घरात ठेवला अन् नंतर घाटात फेकून दिला, गर्लफ्रेंडसह दोघांना बेड्या; 15 वर्षांच्या नात्याचा थरारक शेवट!

SCROLL FOR NEXT