Siddharth Malhotra Kiara Advani Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Siddharth-Kiara Wedding: कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा 'या' दिवशी घेणार सात फेरे...

लग्नस्थळापासून ते फंक्शन, आऊटफिट्स, निमंत्रितांविषयी... जाणून घ्या सर्व तपशील

Akshay Nirmale

Siddharth Malhotra Kiara Advani Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या स्टार कपलने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार दोघांच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हे जोडपे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.

लग्नाचे ठिकाण ते लग्नाआधीच्या फंक्शन्स आणि वेडिंग आउटफिट्सपर्यंत सर्व माहिती समोर आली आहे.

या लग्नात दोघांचे केवळ कुटुंबीय आणि काही खास मित्र सहभागी होतील. लग्नाआधीच्या संगीत, मेहेंदी आणि हळदी हे कार्यक्रम होणार आहेत. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी हे सेलिब्रेशन होणार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

लग्नाला हे सेलिब्रिटी उपस्थित राहणार

कियाराने तिचा 'कबीर सिंग' मधील सहकलाकार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतला आमंत्रित केले आहे. याशिवाय करण जोहर, मनीष मल्होत्रा, वरुण धवन आणि अश्विनी यार्दी यांनाही लग्नासाठी आमंत्रित केले आहे.

कियाराची जिवलग शाळकरी मैत्रीण ईशा अंबानीने नुकतेच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, ती देखील या सोहळ्यात सहभागी होऊ शकते.

मेहंदी आर्टिस्ट

सेलिब्रिटी आर्टिस्ट वीणा नागदा कियारा अडवाणीच्या हातावर मेहंदी काढणार आहे. वीणाने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत ज्यात तिने ती राजस्थानला रवाना होत असल्याचे म्हटले आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्न राजस्थानातच होत आहे.

लग्नाचे ठिकाण

राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचे भव्य लग्न होणार आहे. हा राजवाडा एखाद्या ड्रीम डेस्टिनेशनपेक्षा कमी नाही. हे हॉटेल सुंदर निसर्ग आणि हिरवाईच्या मधोमध वसलेले आहे. या राजवाड्यात अलिशान बडदास्त ठेवली जाणार आहे.

मनिष मल्होत्राने डिझाईन केले कपडे

लग्नात हे जोडपे स्टार फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले ड्रेस परिधान करणार आहेत. कियारा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करेल तर सिद्धार्थ लाल शाफासह ऑफ-व्हाइट शेरवानी घालेल.

चोख सुरक्षाव्यवस्था

शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासिन हा सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावेळी सुरक्षा पुरविणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT