Malika-Arjun Dainik Gomantak
मनोरंजन

Malika-Arjun: पार्टी सोनम कपूरची तरीही सर्वांच्या नजरा फक्त मलायका-अर्जुन जोडीवर

दिवाळीपूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या घरी पार्टीचे आयोजन करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Maliaka Arora And Arjun Kapoor) हे बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार कपल आहेत. दोघांची गोंडस केमिस्ट्री अनेकांचे लक्ष वेधून घेतात. मलायका आणि अर्जुन अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसतात. अलिकडेच दोघेही सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) दिवाळी पार्टीत एकत्र आले होते, त्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिवाळीपूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या घरी पार्टीचे आयोजन करतात. यावेळी शिल्पा शेट्टी, एकता कपूर, मनीष मल्होत्रा, क्रिती सेनॉन, रमेश तौरानी, ​​आनंद पंडित आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यात बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला होता. सोनम कपूरनेही दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मलायका आणि अर्जुनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी एकमेकांचा हात धरून पार्टीत आले.

मलायका आणि अर्जुन पारंपारिक पोशाखांमध्ये सुंदर दिसत होते. अर्जुन कपूर नेहमीप्रमाणे काळ्या पोशाखात दिसत होता, त्याने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर, मलायका ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. मलायकाचा ड्रेस इंडो-वेस्टर्न स्टाईलचा होता. मलायकाने डीप नेक ब्लाउजसह हिरव्या रंगाचा स्लिट स्कर्ट घातला होता.

23 ऑक्टोबरला मलायका अरोराने तिचा 49 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अर्जुनने आपल्या प्रेमिकाला रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये दोघे रोमँटिक शैलीत मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT