Raksha Bandhan 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Raksha Bandhan 2023: अक्षय कुमार, क्रिती सॅनन, कंगना रणौतसह बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी असा साजरा केला रक्षाबंधन...

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनचा सण बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Rahul sadolikar

Bollywood Celebrity Share Photo With Their Siblings: बॉलीवूडचे सेलिब्रिटी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावंडासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

कित्येक सेलिब्रिटींनी आपल्या भावंडांसोबतचे फोटो आणि त्यांच्यासाठी गोड संदेशही सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

बॉलीवूडच्या सेलिब्रिटींपैकी अक्षय कुमार , क्रिती सॅनॉन ,कंगना राणौत आणि संजय दत्त सारखे कलाकार आणि झोया अख्तर या कलाकारांनी आपल्या लाडक्या भावंडांसोबतचे गोड क्षण साजरे केले आहेत.

अक्षय आणि अलका भाटिया

अक्षयने त्याची बहीण अलका भाटियासोबत एक फोटो पोस्ट केले आणि लिहिले, “जो तू मेरे नाल है ते जिंदगी विच सब चंगा” याचा अर्थ तु माझ्यासोबत असताना आयुष्यात सर्व काही ठीक असतं.

माझी बहीण, माझा आधारस्तंभ. पहिल्या दिवसापासूनची शक्ती. #रक्षाबंधनाच्या शुभेच्छा” गेल्या वर्षी आनंद एल राय यांच्या रक्षाबंधन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अक्षय नुकताच OMG 2 या कोर्टरूम ड्रामामध्ये दिसला होता.

क्रितीने बहिणीसोबत शेअर केला फोटो

क्रितीने बहीण आणि अभिनेत्री नुपूर सॅननसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, “The Sanon Sisters!! @nupursanon Sisterssss the besttttt!!  क्रितीसाठी हे वर्ष विशेष असणार आहे. 24 ऑगस्ट रोजी घोषित झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिमी या चित्रपटासाठी मिळाला आहे.”

संजय दत्त - प्रिया दत्त

अभिनेता संजय दत्तने त्याच्या बहिणी प्रिया दत्त आणि नम्रता दत्त यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “ प्रिय प्रिया आणि अंजू, या रक्षाबंधनाच्या दिवशी, मी तुम्हा दोघांनाही तुमच्याबद्दल असलेल्या प्रेम आणि आदराची आठवण करून देऊ इच्छितो.

 जसे तुम्ही माझ्या शक्तीचे आधारस्तंभ आहात, त्याचप्रमाणे मी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतो, या बंधनाचे रक्षण आणि कदर करेन. आमचे नाते बहिणीच्या प्रेमासारखे शुद्ध आणि अतूट राहो. तुम्हाला आनंददायी आणि आशीर्वासह रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

प्रिया दत्त यांची कमेंट

प्रिया दत्त यांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर दिले, “भैया तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांसाठी असू. या कमेंटसोबत प्रिया दत्त यांनी रेड हार्ट इमोजीही वापरली आहे.”

गेल्या वर्षी करण मल्होत्राच्या पीरियड अॅक्शन चित्रपट शमशेरामध्ये संजय शेवटचा निगेटिव्ह रोलमध्ये दिसला होता.

झोया अख्तरची पोस्ट

झोयाने 2009 मधला सहकारी चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, जो तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या लक बाय चान्सच्या प्रमोशनल मुलाखतीचा होता. त्या चित्रपटात फरहान मुख्य भूमिकेत होता.

झोयाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमच्या पहिल्या चित्रपटासाठी एक मुलाखत, ही प्रतिमा आमच्या एकत्र आयुष्याचा सारांश देते. .”

फरहानची कमेंट

फरहानने कमेंटमध्ये उत्तर दिले, "एर तुम इतने दूर हो .. लव्ह यू झो" झोया आणि फरहान यांनी अलीकडेच त्यांचा सह-निर्मिती, प्राइम व्हिडिओ इंडियाचा मूळ शो मेड इन हेवन सीझन 2 रिलीज केला, ज्यामध्ये झोयाने पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले आहे.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT