Mauni Roy Dainik Gomantak
मनोरंजन

Mouni Roy: मौनीचा दिवाळी लूक पाहुन चाहते भलतेच खुश..

Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचा दिवाळी लूक पाहुन चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Rahul sadolikar

Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयला आता कुठल्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. तिने आजवर साकारलेल्या पौराणिक मालिकांतील भूमीकांमधून किंवा चित्रपटातील पात्रांतून तिने चाहत्यांना वेड लावलं आहे.

मौनी सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने आपला दिवाळी लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चला पाहुया

नागीनीची चाल

बॉलीवूडची सुंदर मौनी रॉय दिवाळीच्या दिवशी हातात दिवा घेऊन 'नागिन' सारखी चाल दाखवताना दिसली. अभिनेत्रीने दिवाळीच्या लूकमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

काही फोटोंमध्ये मौनी तिच्या पतीसोबत आराम करताना दिसली तर काही फोटोंमध्ये ती कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देताना दिसली.

 या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर दिसत आहे की हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. फोटोंमध्ये मौनी रॉयच्या किलर लूकची एक झलक पहा.

दिवाळी लूक

दिवाळीला मौनीने मरुन रंगाची प्लेन साडी वाइड बॉर्डर घातलेली दिसली. या साडीसोबत डिझायनर ब्लाउज परिधान करून कॅमेऱ्यासमोर ती तिचा किलर लूक दाखवताना दिसली. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी किलर दिसत होती की फोटोंवरून तिची नजर हटवणे कठीण होत आहे.

मौनी अशी तयार झाली

तिचा लूक अजून वेगळा करण्यासाठी मौनीने तिच्या गळ्यात रुंद हेवी चोकर नेकलेस आणि कानात झुमके घातले होते. यासोबतच ती तिच्या चेहऱ्यावर आणि खुल्या केसांवर बारीक मेकअप करताना दिसली.

ग्लॅमरस लूक

या खास प्रसंगी मौनी मरून रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत असताना तिचा नवरा सूरज नांबियार पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अभिनेत्रीसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसला. मौनीचा हा लूक अगदी साधा आणि सोबर आहे. असे असूनही, या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत आहे.

मौनीचे आगामी प्रोजेक्ट्स

मौनीने तिच्या किलर लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील मौनीच्या चेहऱ्यावरची चमक आणि तिची स्टाइल पाहून सगळेच वेडे झाले आहेत. 

मौनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मौनी अलीकडेच रिलीज झालेल्या 'सुल्तान ऑफ दिल्ली' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. याशिवाय मौनी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. मौनी टीव्हीवरून चित्रपटात आली असेल पण तिच्याकडे खूप चांगले प्रोजेक्ट आहेत.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT