44th Cairo Film Festival 2022 Jury Dainik Gomantak
मनोरंजन

44th Cairo Film Festival: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीमध्ये समाविष्ट झालेली स्वरा भास्कर पहिली भारतीय कलाकार

44th Cairo Film Festival: हा चित्रपट महोत्सव सर्वात जुना आणि सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे.

दैनिक गोमन्तक

44th Cairo Film Festival: बॉलिवूडमधील अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या रोकठोक स्वभावामुळे ओळखली जाते. पण स्वरा भास्कर ही आता कोणावर केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर, एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

इजिप्तमध्ये सुरु झालेल्या काहिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरीमध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करही सहभागी झाली आहे. या महोत्सवात ज्युरी म्हणून सहभगी होणारी स्वरा भास्कर ही पहिली भारतीय कलाकार ठरली आहे.

दरम्यान, हा चित्रपट (Movie) महोत्सव इजिप्तमधील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव असून, यात ऑस्कर सारख्या आणि गोल्डन ग्लोबसारखे मोठे पुरस्कार जिंकलेले प्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित केले जातात. अशा प्रसिद्ध महोत्सवात ज्युरीम्हणून संधी दिल्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानत महोत्सवातील काही खास फोटो स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

काहिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्युरी म्हणून स्वरा भास्करसोबत, जपानी (Japan) चित्रपट निर्माती नाओमी कवासे (Naomi Kawase) आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष असाणार आहे. तसेच, इजिप्शियन सिनेमॅटोग्राफर नॅन्सी अब्देलफत्ताह, संगीतकार रागा दाऊद, इटालियन अभिनेता स्टेफानिया कॅसिनी, मेक्सिकन चित्रपट निर्माता जोआकिन डेल पासो आणि मोरोक्कन अभिनेता समीर गुसेमी हे देखील सहभागी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT