Actor Ronit Roy (Bollywood) Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood: करोना काळात या तीन अभिनेत्यांचे फार मोठे उपकार; अभिनेता रोनीत रॉय

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर यांनी रोंनीत रॉय चालवत असलेल्या सुरक्षा एजन्सीला महामारीच्या काळात आर्थिक सहाय्य केले (Bollywood)

Dainik Gomantak

Bollywood: रोनित रॉय (Ronit Roy) म्हणाला की अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan), अक्षय कुमार (Akshay Kumar), करण जोहर (Karan Johar) यांनी त्यांच्या सुरक्षा एजन्सीला (Security Agencies) महामारीच्या (Covid 19 Epidemic) काळात गरजेसाठी पैसे दिलेत, पैसे देण्यात कधीच मागे हटले नाही, असे अभिनेता रोनित रॉय यांनी उघड केले आहे. रोनित म्हणाला की, बऱ्याच लोकांनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना गोंधळात टाकलेहोते. परंतु मला तसे करायचे नव्हते. जेव्हा मला पैशांची चणचण भासली, तेव्हा या तिघांनीही पैशाच्या बिलांचा विचार ना करता पैसे खात्यात टाकले.

रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्ननशी (Redio Host Siddharth Kannan) बोलताना रोनित म्हणाला की, ज्या गोष्टीची लोकांना गरज नाही अश्या सेवांसाठी लोकं पैसे देणे टाळतात, 'हा व्यवसायाचा असल्याने आपल्याला त्याबद्दल वाईट वाटत नाही.

"तर, मिस्टर बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर. यांनी मला पैसे दिल्यानंतर कधी पैश्यांबद्दल कधीही विचारले नाही. खरं तर, त्याकाळात सर्वकाही बंद होते, हे लोक सुद्धा त्याकाळात घरीच होते, त्याची मुलं सुद्धा घरी होती. त्याच्या कार्यालयातून मला फोन आला की, जेव्हा व्यवसाय पुन्हा सुरू होईल तेव्हा आम्हाला बिल पाठवा. मी आणि माझ्या पत्नीने ठरवले की माझ्या पेरोलवर माझ्याकडे 100 कर्मचारी होते. कोणाची आई आजारी होती, कोणाचे वडील आजारी होते, कोणाची बायको गर्भवती होती, कुणाला महिन्यापूर्वी बाळ होते आणि दुसऱ्याला त्यांच्या घरी EMI भरायचे होते.

रोनित म्हणाला की त्याने साठवलेल्या बचतीतून पैसे काढले, त्याची इक्विटी आणि शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना विकले. तो म्हणाला की काही लोकांनी त्याला आधीच केलेल्या कामाचे पैसे देण्यापासून रोखले. दरम्यान, त्याच्या काही मित्रांनी त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल लेख वाचले आणि त्याला मदत करण्याची ऑफर दिली. रोनितची पत्नी आणि 'गुरू'नेही त्याला आश्वासन दिले की तो आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन योग्य काम करत आहे. तो जे विकले ते तो नेहमी परत विकत घेऊ शकतोस, परंतु कर्मचाऱ्यांचे मिळणारे आशीर्वाद अमूल्य आहेत. अभिनेता रोनित म्हणाला की, त्याला देखील वैयक्तिक खर्च आणि ईएमआय भरावे लागतात, परंतु गेल्या वर्षी महामारीमुळे सुरुवातीच्या दिवसात सरकारने दिलेली 3 महिन्यांची सूट स्वीकारली नाही.

रोनित आता वूट वेब सीरीज 'कँडी'मध्ये झळकणार आहे. त्याने क्राइम ड्रामामध्ये शिक्षकाची भूमिका साकारली आहे, ज्यात रिचा चड्ढा देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT