Salman Khan
Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif शिवाय सलमान खान 'या' अभिनेत्रींना करतो फॉलो, यादी पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य !

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला इंस्टाग्रामवर 42 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. पण सलमान खान केवळ 34 लोकांना फॉलो करतो. बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान आजकाल त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यासाठी सज्ज आहे. इंस्टाग्रामवर सलमान खानला 51 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर सलमान खान नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या फार्महाऊसवरील त्याचे व्हिडिओ किंवा कधीकधी त्याचे वर्कआउटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Salman Khan Instagram Followers News)

सलमानला इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो लोक फॉलो करतात. सलमान इंस्टाग्रामवर एकूण 34 लोकांना फॉलो करतो आणि या यादीत फक्त सात अभिनेत्री आहेत. अंदाज लावण्यास काही हरकत नाही, त्यापैकी एक म्हणजे कतरिना कैफ. कतरिना आणि सलमान, ज्यांनी भारत आणि टायगर जिंदा है व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये (Movie) एकमेकांसोबत काम केले आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांना डेट करायचे. या नावांव्यतिरिक्त, सलमान त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील फॉलो करतो ज्यात भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान, बहिणी अर्पिता खान शर्मा आणि अलविरा अग्निहोत्री आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांचा समावेश आहे.

सलमान खान इंस्टाग्रामवर कतरिना कैफ (Katrina Kaif) व्यतिरिक्त, संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani) , डेझी शाह(Daisy Shah), वालुशा डी सौसा, जॅकलीन फर्नांडीज (Jacqueline Fernandez) , युलिया वंतूर(Iulia Vantur) , आणि इसाबेल कैफ. यांना फॉलो करतो. 'भारत' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत नव्हती. याआधी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कुमुद रैनाची भूमिका साकारणार होती. पण सलमान खानच्या सांगण्यावरून कतरिनाला 'भारत' (Bharat) चित्रपटामध्ये घेण्यात आले. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये चांगलीच पसंती मिळाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : एल्‍टन डिकॉस्ता हे स्‍वघोषित ‘जायन्‍ट किलर’ : बाबू कवळेकर

Valpoi News : वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक

Bicholim Factory Explosion : कारखाना मालकाला अटक करा; स्फोट प्रकरणी स्थानिकांत संताप

Bardez Water Shortage : बार्देशवासीयांच्या पाचवीला पूजलेलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य; टॅंकरवरच भिस्त

Goa Public Service Commission: सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती

SCROLL FOR NEXT