Emraan Hashmi and Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood Celebrity Gossips: इमरान हाश्मी आणि आलिया भट्टचे खास कनेक्शन

बॉलीवूडमधील सीरियल किसर म्हणजेच इमरान हाश्मी आणि 'गंगूबाई काठियावाडी'मधील अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यात एक खास कनेक्शन आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई काठीयावाडी चित्रपटाच्या यशानंतर सातत्याने सोशल मिडियावर चर्चेत असते. आलिया तिच्या चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर आलियाच्या लव्ह लाईफपासून तिच्या सह कलाकारांसोबतच्या बॉंडिंगपर्यंतच्या चर्चा आहेत, पण आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्यात खास नाते आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. बॉलीवूडमधील (Bollywood) सीरियल किसर म्हणजेच इमरान हाश्मी आणि 'गंगूबाई काठियावाडी'मधील अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यात भावा- बहिणीच नातं आहे.

इमरान हाश्मीचे (Emraan Hashmi) वडील म्हणजेच अन्वर हाश्मी हे अभिनेत्री पूर्णिमा दास वर्मा यांचा मूलग आहे. पौर्णिमा दास यांची बहीण शिरीन मोहम्मद ही चित्रपट दिग्दर्शक महेश आणि मुकेश भट्ट यांची आई आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर इमरान हाश्मीची आजी आणि आलिया भट्ट आजी या सख्या बहिणी आहेत. त्यानुसार इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) चुलत भाऊ आणि बहिण आहेत.

इमराण हाश्मीने बॉलीवुडमध्ये 18 वर्ष पूर्ण केली आहे. मर्डर, गँगस्टर, जन्नत यासरख्या चित्रपटातून सीरियल किसरची ओळख मिळवलेल्या इमरान हाश्मीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता इमरान हाश्मीने आपली किसिंग किंगची ओळख मागे टाकत अॅक्शन आणि सस्पेन्स चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.तर आलिया ब्रह्मास्त्र आणि आरआरआर या चिटपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT