बॉलिवूडमध्ये (Bollywood) कमी कालावधीतच सनी लिओनीने (Sunny Leone) प्रचंड लोकप्रियता मिळवली. तीची ही लोकप्रियता यावरुनच दिसून येते की भारतीयांनी सर्वात अधिक वेळा गुगल सर्च केलेल्या विषयांमध्ये दरवर्षी सनीचं नाव आघाडीवर असतं. गेल्या काही वर्षामध्ये सनी लिओनीने चित्रपटसृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला आणि आता तिला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मात्र भारतामध्ये सनीला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर 2018 साली ती एका आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा धक्कादायक खुलासा किंवा वक्तव्यांसाठी ती कधीच चर्चेत नव्हती तर एका गमतीदार कारणामुळे तिच्या नावाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होती. हे कारणं होत सनी लिओनीचं एक पोस्टर.
आंध्रप्रदेशमधील (Andra Pradesh) नल्लोर जिल्ह्यामधील एका शेतकऱ्यांने त्याच्या शेतामध्ये चक्क सनीचे दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावली असल्य़ाची बातमी समोर आली आणि सोशल मिडियावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये सनी एका लाल रंगाच्या बिकनीमध्ये पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर या पोस्टरवर तेलूगूमध्ये एक ओळही लिहली आहे. या ओळीचा अर्थ असा की, ''माझ्यासाठी अश्रू ढाळू नका किंवा माझा कोणीही मत्सर करु नका'' आता तुमच्या मनात सवाल उपस्थित झाला असेल की, या शेतकऱ्याने सनीचा पोस्टर आपल्या शेतामध्ये कसा काय लावला असेल. तर यामागे एक हटके लॉजिक आहे. आपल्या शेतामध्ये पिकविणाऱ्या शेतमालाला नजर लागू नये म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि शेतामधील मालाऐवजी या पोस्टरकडेच पहिल्यांदा नजर जावी या कारणासाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान लीस आणि कृषी अधिकाऱ्यांना हे पोस्टर आक्षेपार्ह वाटलं नाही का यासंदर्भात बोलताना अक्कीनापल्ली यांनी आपण कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केले नसल्याचे सांगितले आहे. आम्हाला शेती करताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे अधिकाऱ्यांनी कधी पाहिलं आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना या पोस्टरबद्दल कोणतेही आक्षेप असण्याचं कारण दिसत नाही, असं अक्कीनापल्ली यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान या पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली सनी 'रंगीला' आणि 'शेरो' या मल्याळम चित्रपटांमधून टॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.