Bobby Deol  Dainik Gomantak
मनोरंजन

Bobby Deol: '...म्हणून बॉबी देओल अन् ट्विंकल खन्नाचे पटले नाही' अभिनेत्याने केला खुलासा

दैनिक गोमन्तक

Bobby Deol: 'अॅनिमल' चित्रपटात सर्वात कमी वेळ असणारी बॉबी देओलचे पात्र आणि त्याची भूमिका चांगलीच गाजली आहे. या चित्रपटानंतर अभिनेता चांगलाच चर्चेत आहे. याबरोबरच, त्याची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याने ट्विंकल खन्नावर या मुलाखतीत वक्तव्य केले होते.

बॉबी देओलने 1995 ला बॉलीवूडच्या दुनियेत प्रवेश केला. त्याचा पहिला चित्रपट ट्विंकल खन्नासोबत 'बरसात' हा होता. फिल्मफेअरला दिलेल्या जून्या मुलाखतीत त्याने ट्विंकल खन्नासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. तो म्हणतो- छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात भांडण व्हायची आणि बॉबीच्या भाषेने ट्विंकल खूप अस्वस्थ व्हायची.

2001मधील फिल्मफेअरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने सांगितले होते की, ट्विंकलसोबतचे त्याचे नाते चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीला खूप तणावपूर्ण होते. दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. त्याने सांगितले की तो ट्विंकलला सकाळची दिनचर्या आणि स्वच्छतेबद्दल चिडवत असे. ट्विंकलला ते आवडत नसायचे.

याबरोबरच, एक प्रसंग आठवताना बॉबी देओलने सांगितले की, एकदा ट्विंकल सेटवर बेशुद्ध पडली होती. त्याने सांगितले की, ट्विंकल बेशुद्ध होताच शूटिंग थांबवण्यात आले, कारण मनालीजवळील रोहतांग पासमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे घडले असावे अशी भीती लोकांना वाटत होती. तिला दवाखान्यात घेऊन जातानाच्या प्रवासादरम्यान तो नक्कीच अस्वस्थ झाला होता आणि त्याने ट्विंकलचा हात धरला होता. पुढे तो म्हणतो- आता मला ते दिवस आठवले किंवा भांडण आठवले की मी आजही खूप हसतो. चित्रपटानंतर या दोन्ही कलाकरांनी आपले भांडण मिटवले होते. असेही अभिनेत्याने मुलाखतीत म्हटले आहे.

दरम्यान, अॅनिमल चित्रपटानंतर बॉबी देओलने निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता तो लवकरच कांगुआ या चित्रपटात पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT