Bobby Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Bobby Deol: 'आम्ही देव आहोत...'असं म्हणत आश्रमचा बाबा निराला प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला

Bobby Deol: आता अॅनिमल नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या आश्रमच्या चौथ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bobby Deol: 'अॅनिमल' या चित्रपटाचा रिलिज झाल्यापासून चर्चांचा भाग बनला आहे. यानिमित्ताने चित्रपटातील कलाकरांचीदेखील मोठी चर्चा झाली होती. चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेनेदेखील चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. आता अॅनिमल नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या आश्रमच्या चौथ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉबी देओलच्या 'आश्रम' या हिट मालिकेच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब शोने आत्तापर्यंतच्या तीन सीझनमध्ये प्रेक्षकांना वेड लावले आहे आणि बॉबी देओलने एक अप्रतिम पुनरागमनही केले आहे. या मालिकेत अभिनेत्याने बाबा निराला ही व्यक्तिरेखा इतक्या उत्कृष्टपणे साकारली की तीच त्याची नवीन ओळख बनली. याआधी या शोचे तीन सीझन आले आहेत आणि आता अखेरीस त्याच्या चौथ्या सीझनबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

चाहत्यांना यावर्षी त्यांचा आवडता शो पाहता येणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत ओटीटीवर वर्चस्व गाजवणार असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की 'आश्रम 4' या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. याचा अर्थ लवकरच बॉबीच्या चाहत्यांना बाबा निरालाच्या कारनाम्यांचे रहस्य उलगडताना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, 'आश्रम सीझन 4' चा टीझर दोन वर्षांपूर्वी जून 2022 मध्ये रिलीज झाला . तथापि, 'आश्रम 4' च्या रिलीजच्या तारखेबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही अधिकृत केले नाही. 'आश्रम 4' च्या टीझरमध्ये बाबा निराला 'आम्ही देव आहोत, तुम्ही देवाला कसे अटक करू शकता' असे म्हणताना दिसत आहे. आता सीरीजच्या चौथ्या भागात प्रेक्षकांना नक्की काय मिळणार हे वेब सीरीज रीलीज झाल्यानंतरच समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT