जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज लिमिटेड (ZEEL) च्या बोर्डाने सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया मध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. नवीन कंपनीत सोनीची 50.86 टक्के भागीदारी असेल. त्याच वेळी, एस्सेल, ZEEL चा प्रवर्तक समूह 3.99% हिस्सा धारण करेल. ZEEL च्या भागधारकांकडे 45.15 टक्के हिस्सा असेल.
नवीन कंपनीच्या नऊ सदस्यीय मंडळात पाच सोनी (Sony) एक्झिक्युटिव्ह आणि पुनीत गोयंका पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे MD आणि CEO असतील. या विलीनीकरणानंतर, कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केली जाईल. या विलीनीकरणाअंतर्गत, झी एंटरटेनमेंट (Zee Entertainment) आणि सोनी पिक्चर्स दोन्ही त्यांचे संबंधित लाइनर नेटवर्क, डिजिटल मालमत्ता, उत्पादन व्यवसाय आणि प्रोग्राम लायब्ररी विलीन करतील.
22 सप्टेंबरला हा करार जाहीर करण्यात आला होता, मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच स्टॉकमध्ये वाढ झाली. सप्टेंबरच्या सुरुवातीला हा स्टॉक 171 च्या पातळीवर होता. आज स्टॉक 349 च्या पातळीवर पोहोचला आहे, म्हणजेच या कालावधीत स्टॉक 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
दोन्ही कंपन्यांनी बंधनकारक करारावर स्वाक्षरी केली आहे. बंधनकारक कराराचा अर्थ असा आहे की आता ZEEL फक्त Sony मध्ये विलीन होईल. दोन्ही कंपन्यांमध्ये पहिल्या 90 दिवसांसाठी बंधनकारक नसलेला करार होता. म्हणजे, 90 दिवसांसाठी, दोन्ही पक्षांना हवे असल्यास ते माघार घेऊ शकतात. पण, 90 दिवसांच्या वाटाघाटीनंतर दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. करारानुसार, सोनी 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल आणि विलीन झालेल्या कंपनीमध्ये 50.86% हिस्सा धारण करेल.
या कराराचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांची सामग्री आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतील. त्यामुळे सोनीला भारतात आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळणार आहे. ZEEL च्या माध्यमातून सोनीला जगभरात 130 कोटी लोकांची व्ह्यूअरशिप मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.