गोड साखरनिर्मितीमागे दडलेल्या ‘तिखट’ वेदनांची कथा Dainik Gomantak
मनोरंजन

गोड साखरनिर्मितीमागे दडलेल्या ‘तिखट’ वेदनांची कथा

‘बिटरस्वीट’मध्ये (BitterSweet) महिला (Women) ऊसतोडणी मजुरांच्या हृदय (Heart) पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची कथा आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘बिटरस्वीट’मध्ये (BitterSweet) महिला (Women) ऊसतोडणी मजुरांच्या हृदय (Heart) पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची कथा आहे. या महिला अशा परिस्थितीत अडकल्या आहेत की त्या ती टाळू शकत नाहीत, त्यातून त्या सुटू शकत नाहीत. ही भारताच्या (India) गोड साखरनिर्मितीमागच्या वेदनांची तिखट कथा (Story) आहे. आपण जी साखर वापरतो ती खऱ्या आयुष्यात किती कडू असू शकते, हे या कथेतून कळते असे सिनेमाचे (Movie) लेखक- दिग्दर्शक अनंत महादेवन (Anant Mahadevan) यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील महिला ऊसतोडणी मजुरांची वेदना महादेवन यांनी मांडली आहे. ब्राझिलला (Brazil) मागे टाकत ऊस निर्यातीत भारताचा क्रमांक एक बनवण्याच्या शर्यतीत, रोजची भाजी-भाकरी मिळवण्याच्या संघर्षापायी महिला ऊसतोडणी मजुरांना अनेक भयानक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. ऊसतोडणीचा कालावधी वर्षातील फक्त सहा महिने असतो आणि त्यांना उर्वरित वर्ष तोडणीच्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेवर जगावे लागते. त्यामुळे महिला (Women) मजुरांना एक दिवसही सुट्टी घेणे परवडत नाही. परंतु दुर्दैवाने मासिक पाळीमुळे (Menstruation) त्यांना दर महिन्याला तीन ते चार दिवस गमवावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी, बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गर्भाशय काढून टाकण्याची जीवघेणी विचित्र प्रथा सुरू झाली.

यावर प्रकाश टाकणारा ‘बिटरस्वीट’ (BitterSweet) चित्रपट (Movie) अनंत महादेवन यांनी तयार केला आहे. इफ्फीमध्ये (IFFI) या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, की भारताच्या (India) कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देत असताना आपण नेहमीच मानवी पैलू जपले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याच्या शर्यतीत आम्ही मानवी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत.

बलाढ्य साखरसम्राटांचा दरारा :

साखरसम्राटांची ताकद खूप माेठी आहे. चित्रपटात (Movie) आम्ही दाखवले आहे की एक सरकारी अधिकारी समस्यांची चौकशी करत आहे. परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने या क्षेत्रातील रोजगार (Employment) गमावण्याच्या भीतीने कोणतीही महिला (Women) आवाज उठवायला पुढे येत नाही. स्वेच्छेने त्या हे करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भयावह सत्यामुळे कायदे करणारे आणि सामाजिक कार्यकर्ते हा मुद्दा हाताळण्यात हतबल ठरतात. प्रभावी साखरसाम्राट अडथळा आहे, असे महादेवन (Anant Mahadevan) म्हणाले.

युपी, बिहारच्या भोंदू डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारच्या (Bihar) भागांतून स्थलांतरित झालेले भोंदू आणि पात्रता नसलेले स्त्रीरोगतज्ज्ञ बीडमध्ये आले आणि पैसे कमावण्यासाठी या महिलांना ‘हिस्टेरेक्टॉमी’ची-गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ लागले. महिलांना हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले की त्यांच्या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होईल, जसे की मासिक पाळीत (Menstruation) दर महिन्याला होणाऱ्या वेदना, त्या दिवसांत वेतन कमी होणे, गर्भाशयातील गाठींची संभाव्य वाढ यापासून त्यांची सुटका होऊ शकते. विशेष म्‍हणजे महिला (Women) त्‍यास बळी पडल्‍या, असे महादेवन (Anant Mahadevan) म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT