रावी झळकतेय तीन भूमिकांत

अभिनेत्री रावी किशोरचा एक लघुपट (Short Film) इफ्फीत (IFFI) दाखविला जाणार असून उर्वरित दोन चित्रपट (Movie) एनएफडीसी फिल्म बाजारात ‘रेकंमेंडेशन’ विभागात आहेत.
रावी झळकतेय तीन भूमिकांत
रावी झळकतेय तीन भूमिकांतDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इफ्फीमध्ये (IFFI) आपला किमान एखादा सिनेमा तरी निवडला जावा यासाठी कित्येक कलाकार, तंत्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतात. अशावेळी गोव्यातील (Goa) बहुभाषिक अभिनेत्री रावी किशोर (Actress Ravi Kishor) ही मुख्य भूमिकेत तीन चित्रपट यंदा इफ्फीशी (IFFI 2021) संबधित आहेत. यापैकी एक लघुपट (Short Film) इफ्फीत (IFFI) दाखविला जाणार असून उर्वरित दोन चित्रपट (Movie) एनएफडीसी फिल्म बाजारात ‘रेकंमेंडेशन’ विभागात आहेत.

या वर्षीच्या इफ्फीमध्ये (IFFI) रावीचे मराठी भाषेतील ‘वाट’ (दिग्द. मिरांशा नाईक) या पूर्ण लांबीच्या सिनेमाचे आणि हिंदी भाषेतील ‘पिकाबू (दिग्द. शमल चेकॉव्ह) या लघुपटाचे (Short Film) एनएफडीसी फिल्म बाजारच्या अनुक्रमे एनएफडीसी रेकमेंडेशन आणि फिल्म लायब्ररी या विभागात निवड आणि प्रसारण झाले. तर कुपांचो दर्यो (दिग्द. हिमांशू सिंग) या कोंकणी लघुपटाची गोवा (Goa) प्रीमिअर विभागात निवड झाली आहे. या तीनही सिनेमांत तिच्या भूमिका एकमेकाहून अगदी भिन्न आणि वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. गोवा (Goa) कला अकादमीच्या रेपट्री कंपनीतून पुढे आलेल्या रावीने सुरुवातीच्या काळात नाटकाच्यामाध्यमातून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्रातून एमए केले. त्यानंतर तिला तेलगू सिनेसृष्टीतून बोलावणे आल्यानंतर तिने काही तेलगू जाहिराती आणि वेबसिरीजमध्ये (Web series) काम केले. त्याचवेळी तिची निवड हिंदी (Hindi) आणि कोंकणी (Konkani) भाषेत एकाचवेळी तयार होणाऱ्या ‘बडे अब्बू’ या सिनेमासाठी झाली. राजेश शर्मांंसारख्‍या बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांसोबत त्यांच्या मुलीची भूमिका केली. या सिनेमाची निवड 2019 साली इफ्फिसाठी (IFFI) झाली होती. त्याचवेळी सदर सिनेमाला (Movie) झारखंड येथे राष्ट्रीय सिनेमहोत्सवात (Film Festival) उत्कृष्ट सिनेमासह चार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रावी झळकतेय तीन भूमिकांत
‘मी वसंतराव’ला ‘रेड कार्पेट’चा मान

2019 मध्‍ये मिळाला होता पुरस्कार

2019 साली इफ्फी (IFFI) आणि गोवा (Goa) मनोरंजन सोसायटीच्या वतीने ‘मिनी मुव्ही मॅनिया’ ही सिनेस्पर्धा झाली. त्यात हिमांशू सिंग दिग्दर्शित ‘घरटं’ या लघुपटासाठी रावीला राष्ट्रीय विभागात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (Award) मिळाला होता. तर त्याचवर्षी केरळमधील आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात (International Film Festival) ‘ऑन द राग’ लघु मूकपटातील भूमिकेसाठी ज्युरी स्पेशल मेन्शन अवार्ड (Award) मिळाला होता. एकाचवेळी तीन वेगळ्या भाषेतील, तीन वेगळे सिनेमे इफ्फीत (IFFI) निवडले जाणे याच्यासारखा दुसरा आनंद नाही. अर्थात या सगळ्यामागे माझ्या तिन्ही दिग्दर्शकांचे श्रेय आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळेच कलाकार (Artist) म्हणून नव्याने माझा शोध घेता आला. त्यामुळे हे सगळे यश माझ्यापेक्षाही माझ्या तिन्ही दिग्दर्शकांचे, सहकलाकारांचे आणि निर्मितीसंस्थांचे आहे.

- रावी किशोर, अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com