Big Boss OTT  Twitter/@BBReviewer_5
मनोरंजन

Bigg Boss OTT: जंगलात दिसला सुपरस्टार, विश्वसुंदरीने दिला आशीर्वाद

बिग बॉससोबत पहिल्यांदा काम करण्याबाबत, रेखा उत्साही

दैनिक गोमन्तक

Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि सलमान खान (Salman Khan) व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा (Rekha) आवाज यात ऐकू येत आहे. समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान जंगलात फिरताना दिसतो आहे.

त्यानंतर सलमान खान जेष्ठ अभिनेत्री रेखासोबत एक गाणे गाताना दिसत आहे. दरम्यान एका झाडा सोबत बोलत असतांना त्यातून एक आवाज येतो जो रेखाचा आहे ज्याला सलमान विश्वसुंदरी म्हणतो आहे. अलीकडेच वाहिनीने बिग बॉस ओटीटीचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे ज्यात सुपरस्टार सलमान खान आणि रेखा यांचा व्हॉईसओव्हर ऐकायला मिळाला. प्रोमोच्या सुरुवातीला सलमान जंगलात हरवतो आणि मग रेखाचा आवाज ऐकू येतो. जो एका झाडाचा असतो. आणि दोघे या प्रोमोमध्ये बोलताना दिसून येतात.

बिग बॉससोबत पहिल्यांदा काम करण्याबाबत, रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बिग बॉस हा एक अतिशय 'नायब' शो आहे, ज्यामध्ये नाटक, अॅक्शन, मजा-मस्ती आणि साहस या सर्व काही गोष्टी बघायला मिळतात. बिग बॉसमध्ये काम करताना तुम्हाला क्रॅश कोर्स करायला मिळतो. बिग बॉस 15 च्या प्रोमोसाठी कलर्ससोबत काम करताना मला आनंद होत आहे. माझ्यासाठी हा एक रोमांचक नवीन अनुभव असणार आहे कारण मी 'स्पीकिंग ट्री' साठी आवाज देत आहे, ज्याला सलमानने प्रेमाने 'विश्वसुंदरी' असे नाव दिले आहे, जे एक जिवंत, शहाणपण, आशा आणि विश्वासाने भरलेले झाड आहे. '

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

Goa Politics: खरी कुजबुज; ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT