Big Boss OTT  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss OTT Finalist: 'हा' आहे बीग बॉस ओटीटीचा पहिला फायनलिस्ट

Bigg Boss OTT Finalist: या टास्कमध्ये जो जिंकेल तो फक्त घराचा कॅप्टनच नाही तर 'बिग बॉस ओटीटी 2' चा पहिला फायनलिस्ट देखील बनणार होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bigg Boss OTT Finalist: गेल्या काही दिवसांपासून बीग बॉसचा पहिला फायनलिस्ट कोण असणार याची चर्चा रंगल्याचे दिसून आले होते. बीग बॉस ओटीटी शो सध्या शेवटच्या टप्प्यात असून आता बीग बॉस ओटीटीचा यावर्षीचा पहिला फायनलिस्ट मिळाला आहे.

यंदाचा काही स्पर्धकांमुळे शो ओळखला जाऊ लागला त्या काही मोजक्या स्पर्धकांमध्ये अभिषेक मल्हाण हे नाव अग्रक्रमावर येते. अखेर 'बिग बॉस OTT 2' ला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. अभिषेक मल्हान हा या सीझनचा शेवटचा कॅप्टन तर ठरलाच, पण तो पहिला फायनलिस्टदेखील ठरला आहे.

हा आठवडा फॅमिली वीक होता, ज्यामध्ये स्पर्धकांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी शोमध्ये आले होते. घरातील सदस्यांना त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला स्टार द्यायचा होता. ज्या दोन स्पर्धकांमध्ये जास्तीत जास्त स्टार्स असतील त्यांच्यामध्ये एक टास्क असेल.

या टास्कमध्ये जो जिंकेल तो फक्त घराचा कॅप्टनच नाही तर 'बिग बॉस ओटीटी 2' चा पहिला फायनलिस्ट देखील बनणार होता. आता 'बिग बॉस ओटीटी 2' ला अभिषेक मल्हानच्या रूपाने त्याचा फायनलिस्ट आणि कॅप्टन मिळाला आहे.

सोशल मिडियावर चाहते अभिषेक फायनलिस्ट झाल्यावर आनंद साजरा करत आहेत. दरम्यान, अभिषेक व्यतिरिक्त, एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट, जेडी हदीद, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि बाबिका धुर्वे अजूनही या स्पर्धेत टिकून आहेत. 12-13 ऑगस्टला ग्रँड फायनल असून बीग बॉसचे विजेतेपद कोण आपल्या नावावर कोरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिवंत जाळलं, गोळ्या झाडल्या अन् आता विष पाजलं! कट्टरतावाद्यांनी घेतला जॉय महापात्रोचा जीव; बांगलादेशात हिंदूंच्या क्रूर हत्यांचं सत्र सुरुच

कोकण रेल्वेची मोठी कारवाई! 2025 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 20.27 कोटींचा दंड वसूल

Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

SCROLL FOR NEXT