Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: 'या' स्पर्धकाचा गेम संपला! चाहते म्हणाले 'तिच्या'साठी बिग बॉसने...

Bigg Boss 17 Promo: आता मोठा ट्विस्ट बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसचा १७ वा सीझन शेवटच्या पर्वात आहे. या शोचा हा शेवटचा आठवडा असून सध्या सहा सदस्य घरामध्ये उरले आहेत. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, विकी जैन, मुनाव्वर, अभिषेक कुमार आणि अरुण यांचा समावेश आहे. आता मोठा ट्विस्ट बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये शेवटच्या आठवड्यात शेवटचे नॉमिनेशन आणि इव्हिक्शन होणार असल्याचे बिग बॉस घोषणा करताना दिसत आहे. आता असे म्हटले जात आहे की, विकी जैन या इव्हिक्शनमध्ये घराबाहेर पडला आहे. यानंतर सोशल मिडियावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

लोक आश्चर्यचकित होत असून टॉप 5 मध्ये आहे, तो फायनलमध्ये आहे, हा सर्वात मोठा विनोद असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, मला वाटलं अरुण जाईल. बर्‍याच लोकांनी म्हटले आहे – विकी टॉप 5 साठी पात्र आहे, काहींनी तो विजेतेपदासाठी पात्र असल्याचेही म्हटले आहे.

काहींनी म्हटले आहे - विकी बाहेर आला नाही तर अंकिताला त्याची मते कशी मिळणार, बिग बी चांगलाच गेम खेळला आहे. अंकिताची वोट बँक वाढवण्यासाठी बिग बॉसला हे करावे लागल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आता ग्रँड फिनाले जवळ आला असून बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT