Munawar Faruqui  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: 'विकी असा सेल्समन आहे कि...' म्हणत मुनव्वरने केलं रोस्ट

Bigg Boss 17 Promo: यानंतर मुनव्वर तिकिटे घेऊन बाहेर पडतो, जी त्यांना घरातील लोकांना विकावी लागतात.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉस सीझन 17' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन्स पाहयला मिळाले आहेत. विकी जैन, अभिषेक कुमार, नील भट्ट आणि खानजादी या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. विकी जैन पुन्हा नॉमिनेट झाल्याने त्याला दिसल्याने धक्का बसला आहे. आता तो घरातून बाहेर जाणार असे त्याला वाटू लागले असून तो चितेंत असल्यासारखा दिसत आहे.

आता मात्र बिग बॉसमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. बिग बॉसने मुनव्वरला कन्फेशन रूममध्ये बोलावले. म्हणाले, 'तुम्ही कधी कधी इथे म्हणालात की माझ्या नावावर 50 तिकिटंही विकली गेली, तर त्या दिवशी मी काहीतरी कमावलं असं मानेन. आज त्याची परीक्षा आहे. यानंतर मुनव्वर तिकिटे घेऊन बाहेर पडतो, जी त्यांना घरातील लोकांना विकावी लागतात. त्याच्या शोमध्ये येण्यासाठी त्याला राजी करावे लागेल. त्यासाठी तो एक-एक करून सगळ्यांकडे जातो.

मुनव्वर आधी अंकिताकडे जातो. त्याच्या विनोदाला वाव मिळत असेल तर प्रेक्षक कलाकारासाठी खूप महत्त्वाचा असतो, असं म्हटलं जातं. यानंतर रिंकू धवनने सांगितले की, ती त्याचा शो पाहायला येणार आहे.

या रोस्टिंग शो मध्ये तो विकी आणि मन्नाराला रोस्ट करताना दिसत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, तो विक्कीला म्हणतो की, विक्की भैय्या बिग बॉसच्या घरातील सेल्समन आहेत , ज्याचा धंदा आता बिग बॉसनेच बंद केला आहे. त्यानंतर तो मन्नाराच्या बाबतीत म्हणतो की, ही अभिनेत्री आत्ता बाथरुम एरियामध्ये मला विचारत होती, तू जोक लिहित आहेस का? तर मी तिला सांगितले गेममध्ये पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग नाही, त्यामुळे तू काळजी करु नकोस. मन्नारासाठी मुनव्वरने वापरलेले शब्द ऐकून सगळेच स्पर्धक आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळाले तर मन्नारा असे बोलू नको असे म्हणताना दिसली.

दरम्यान, मुनव्वर आणि मन्नाराची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे. आता मुनव्वरने रोस्ट केल्यानंतर घरातील वातावरण कसे असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT