Bigg Boss 17 Promo Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु होताच अंकिता अन् नील पुन्हा भिडले

Bigg Boss 17 Promo: अंकिता लोखंडे आणि नील भट्ट यांच्यात नॉमिनेशनवरुन जोरदार भांडण झाले आहे. जेव्हा नील अंकिताची नक्कल करू लागला तेव्हा त्यांच्यातील भांडण वाढल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉस १७ च्या सीझन मध्ये सातत्याने काहीतरी ट्विस्ट घडताना दिसत आहेत. वीकेंड का वॉर च्या इंटरटेस्टिंग एपिसोडनंतर आता पुन्हा नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलिज झाला आहे.

अंकिता लोखंडे आणि नील भट्ट यांच्यात नॉमिनेशनवरुन जोरदार भांडण झाले आहे. जेव्हा नील अंकिताची नक्कल करू लागला तेव्हा त्यांच्यातील भांडण वाढल्याचे दिसत आहे. दोघे एकमेकांवर वरचढ ठरताना दिसले आहेत.

यानंतर, नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होते, ज्यामध्ये विक्की जैनने नील भट्टला नॉमिनेट केले की शोमध्ये त्याचा खेळ फार मजबूत नाही, त्यानंतर नीलने अंकिताला नॉमिनेट केले. नॉमिनेशनमागचे कारण विचारले असता नीलने सांगितले की, त्याला अंकिता खोटे वागत आहे असे वाटते. यावरून त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. अंकिता नीलबद्दल सांगते की तो फक्त एक सुरक्षित खेळ खेळत आहे आणि घाबरट आहे.

नंतर नील अंकिताची नक्कल करताना दिसला. यावर अंकिताला राग आला आणि त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, नीलने तेच सुरू ठेवले. या आठवड्यासाठी कोणते स्पर्धक नॉमिनेट होणार हे पाहणे रोमांचक असेल.

समोर आलेल्या माहीतीनुसार, या आठवड्यात रिंकू धवन, खानझादी, विक्की जैन, अंकिता लोखंडे, नील भट्ट, मन्नारा चोप्रा, अनुराग डोवाल आणि अरुण अशी नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे आहेत. दरम्यान, आता बिग बॉसच्या सीझनमध्ये कोण कोणावर भारी पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT