Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: 'हा' सदस्य झाला घराबाहेर; अंकिताला अश्रू अनावर

Bigg Boss 17 Promo: यानंतर घरातील सदस्य भावूक होताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या शोमध्ये दररोज काहीतरी घडताना दिसते. सदस्यांमध्ये वाद-विवाद तर ठरलेलेच असतात. आता मात्र समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये शो मध्ये नवीन ट्वीस्ट समोर आला आहे.

बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये, विकी जैन, सना रईस खान, अरुण, सनी आर्या आणि अनुराग धोभल या विचारवंत घरातील मित्रांना आर्काइव्ह रूममध्ये बोलावण्यात आले होते.

बिग बॉसने विचारले, 'आज मला तुमच्याकडून त्या घरातील तीन सदस्यांची नावे जाणून घ्यायची आहेत, तुमच्या मते ते सदस्य याआधीच घरातून बाहेर जायला हवे होती. यानंतर सना नीलचे नाव घेते, तर विकीही जिग्ना, रिंकू, नील ,अभिषेक आणि नावेद यांची नावे घेतो.

पण विक्कीचे म्हणणे आहे की नावेद थोडा कॉमेडी आहे पण अभिषेक मनोरंजन करु शकत नाही. यानंतर सगळ्यांना एकत्र जमवून बिग बॉस म्हणतात की घर क्रमांक दोनच्या सदस्यांनी मला तीन नावं सांगितली आहेत, ज्यांची या घरातील वेळ आधीच संपायला हवी होती. सध्या या तीन सदस्यांपैकी एक सदस्य बेघर होणार आहे. यानंतर घरातील सदस्य भावूक होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, नावेदचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्याचवेळी जिग्नाला ती डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत तिला आपल्या खेळात आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे.

नावेदच्या जाण्याच्या वेळी अभिषेक, नील, अंकिता सगळेच रडले. जिग्नानेदेखील आपल्याला घराबाहेर जायचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, 3-4 लोकांना घरातून बाहेर काढले जाईल आणि काही वाइल्डकार्ड येतील. आता बिग बॉसच्या घरात नेमके काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

गोवा-शिर्डी, गोवा-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करावी, सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT