Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: घेतलं आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन अन् पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात बिनसलं! कोणतं आहे ते कपल?

Bigg Boss 17: आता या सीझनमध्ये दोन जोड्यादेखील सहभागी झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या १७ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. यावर्षीचा बिग बॉसच्या खेळाचा फॉरमॅटदेखील बदलला आहे. बिग बॉसने आधीच स्पष्ट केले आहे की, जो स्पर्धक बिग बॉससाच्या खेळासाठी उत्तम असेल तो माझा आवडता असेल आणि मी उघडपणे एखाद्याची बाजू घेईन, त्यामुळे खेळ अजून जास्त मजेशीर झाल्याचे म्हटले जात आहे.

आता या सीझनमध्ये दोन जोड्यादेखील सहभागी झाल्या आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी याबरोबरच दुसरी जोडी म्हणजे ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट आहे. आता या जोड्या एकमेकांशीच भांडताना दिसत आहे.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट

एकीकडे ऐश्वर्या शर्माला बिग बॉसचा फॉरमॅट समजत नसल्याचे ती म्हणताना दिसत आहे. बिग बॉसने विचारल्यावरदेखील ती अशाच प्रकारचे संभाषण करताना दिसत असून माझे मूड स्वींग्स होत असल्याचे म्हणत आहे. मात्र नील भट्ट मात्र आपले १०० टक्के देताना दिसत आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी

दुसरीकडे बिग बॉसच्या घरात विकी चांगलाच रमला असून त्याने आपला गेम खेळ खेळण्यास सुरुवातदेखील केली आहे मात्र अंकिताने यावर तक्रार केली आहे. तो सगळ्यासोबत असतो मात्र माझ्यासोबत असत नाही अशी तक्रार अंकिताने विकीकडे केली आहे. याबरोबरच ती म्हणते, मला इतर लोकं दुखवू शकत नाहीत. मला फक्त आपली लोकं दुखावू शकतात आणि तू मला दुखावले आहेस. त्यावर विकी तिला सॉरी म्हणताना दिसत आहे.

आता बिग बॉसच्या घरातील या दोन्ही जोड्यांवर प्रेक्षक मात्र नाराज दिसून आले आहेत. याबरोबरच, असेही म्हटले जात आहे की, बिग बॉस( Bigg Boss )च्या खेळामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

आता खेळ जसा पुढे जाईल तशी कोणता स्पर्धक टिकणार आणि कोणता स्पर्धक नाही हे समजणार आहे. टीव्ही( TV ) मालिकांमधून प्रसिद्ध झालेले कलाकार आता रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता कोण कोणावर भारी पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT