Bigg Boss 17 Ankita Lokhande Vicky Jain fight Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: विकीने अंकितावर उचलला होता हात? अंकिता म्हणाली, पालकांनी हे पाहिले....

Bigg Boss 17: आपली मैत्री इथेच संपली असे मन्नाराने म्हटल्यानंतर मुन्नवर तिच्या वक्तव्याला होकार देताना दिसला आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसचा १७ वा सीझन दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. 'बिग बॉस 17' चा लेटेस्ट प्रोमो रिलीज झाला आहे.

पुन्हा एकदा मन्नारा चोप्रा आणि मुनव्वर फारुकी बसून शांततेत भांडण मिटवताना दिसत आहेत. पण दोघांमधील अंतर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यातही वाद होताना दिसत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा विकी जैनने अंकितावर हात उचलला होता का असा प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रोमोची सुरुवात मन्नारा चोप्रा आणि मुनवर फारुकी यांच्यातील संभाषणाने होते. जिथे अभिषेक कुमारही दोघांसोबत बसलेला दिसत आहे. मन्नारा मुनव्वरला सांगते की तिला त्याच्याशी काही अडचण नाही पण आयशा खानमुळे तो तिच्याशी भांडली आहे.

भविष्यातही तो आयशाचीच बाजू घेईल का? त्यावर गरज पडल्यास भविष्यातही आयेशाला साथ देऊ, असे मुनव्वरने स्पष्टपणे सांगितले. मुनव्वरचे बोलणे ऐकल्यानंतर आपली मैत्री इथेच संपली असे मन्नाराने म्हटल्यानंतर मुन्नवर तिच्या वक्तव्याला होकार देताना दिसला आहे.

अंकिता आणि विकीमधील भांडणेदेखील कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चिन्हे आहेत. तुला सगळ्यांच्या अडचणी दिसतात, मात्र मी कोणत्या गोष्टींमधून जात आहे तुला हे कळत नाही, असे अंकिता विक्कीला म्हणताना दिसत आहे.

त्यावर विकी जैन अंकिताला म्हणाला, 'तुला माहित आहे का तू नॅशनल टीव्हीवर काय बोलत आहेस? आपले घरचे लोक पहात आहेत. त्यानंतर अंकिताने दोन दिवसापूर्वी विकीने तिच्यावर हात उचलल्याची अॅक्शन करत विचारले हे पाहिले नाही का पालकांनी ?

नुकत्याच झालेल्या एपिसोडमधील एक क्लिप व्हायरल झाली होती जिथे विकी जैन अंकितावर हात उगारण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे दिसले होतेमग अंकितालाही आश्चर्य वाटते. त्यानंतर अरुण आणि अभिषेक खोलीत होते आणि त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडियावर विक्की जैनवरही बरीच टीका झाली होती. पण विकी आणि अंकिता यांनी असं काही घडलंच नाही असं म्हटलं होतं. आता अंकिताने केलेल्या अॅक्शननंतर हा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

Betting websites, apps Blocked: ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यावर सरकारचा मोठा 'प्रहार'; 300 हून अधिक बेकायदेशीर वेबसाइट्स आणि ॲप्स ब्लॉक!

SCROLL FOR NEXT