Sushant Singh  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: अंकिताचा सुशांत सिंग राजपूत बरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: 'बिग बॉस चा १७ वा दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. या शोमध्ये असलेले स्पर्धकदेखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेही तिचा पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे.

आता अंकिताने प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत बरोबरच्या नात्याबद्दल शोमध्ये वक्तव्य केले आहे. मुनावर फारुकीसोबत बोलताना अंकिता लोखंडेने खुलासा केला की, ती सुशांत सिंग राजपूतसोबत ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती.

'पवित्र रिश्ता' च्या सेटवर प्रेमात पडले आणि 7 वर्षे एकत्र घालवल्यानंतर 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. तो एका रात्रीत गायब झाला. त्याला यश मिळत असताना लोक त्याचे कान भरत होते. आमच्या नात्यात प्रेम उरले नव्हते. सुशांतच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला स्वतःवरचं प्रेम दिसलं नाही. सुशांतकडून तिला त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे देखील अंकिताने म्हटले आहे.

विकी जैनबद्दल बोलताना अंकिता लोखंडे( Ankita Lokhande) म्हणाली की, जेव्हा त्या दोघांच्यात वाद होतात त्यावेळीही तिला विकीच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम दिसते.

सुशांतला त्यांच्या ब्रेकअपच्या दिवशी शेवटचे पाहिले होते. आम्ही तुम्हाला सांगतो, जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अंकिता दु:खात होती. त्यावेळी विकी जैनने तिला साथ दिल्याचे तिने म्हटले आहे.

दरम्यान, बिग बॉस( Bigg Boss )च्या या १७ व्या सीझनमध्ये अनेक स्पर्धक सामील झाले असून सगळेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. आता प्रेक्षकांचे मन कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT